29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
HomeराजकीयSharad Pawar : मोदी सरकारचे धोरण शेतकरी विरोधी - शरद पवार

Sharad Pawar : मोदी सरकारचे धोरण शेतकरी विरोधी – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी केलेल्या भाषणांमध्ये त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मोदी सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी केलेल्या भाषणांमध्ये त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मोदी सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली. शरद पवार यांचे वय 81 वर्षे असून, ते देशाच्या राजकारणात सक्रीय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धूरा ते आणखी 4 वर्षे सांभाळणार आहेत. दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आली रणन‍िती आखत आहे. त्यात शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. ते राजकारण धुर्रधर आहेत. त्यांचा अनुभव येथे कामी येणार आहे.

81 व्या वर्षी देखील ते तरुणांना लाजवेल असे काम करतात. त्यांचा उत्साह हा वाखणण्या सारखा आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजप शह देण्यासाठी इतर पक्ष एकत्र येणाऱ्याची शक्यता आहे. तशी चाचपणी देखील सुरू झाली आहे. या पूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तेसच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार म्हणाले की, भाजप अनेक पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात शिवसेने सोबत देखील भाजपने हेच केले. शरद पवार भारतीय जनता पार्टी विरोधात इतर पक्षांना सोबत घेऊन एकजुट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : ‘एकनाथ शिंदेंचा सर्वोच्च न्यायालयात खटला, तरीही सरन्यायाधिशांसोबत बसतात हे चुकीचे’

Rahul Gandhi : राहूल गांधी जोडताहेत माणसांची हृदये !

Nitin Gadkari : नितीन गडकरींनी आपल्याच सरकारविरोधात दाखविला ‘अविश्वास’ !

नितीश कुमार यांची शरद पवार यांच्या बरोबर या विषयावर चर्चा झाली होती. शरद पवार यांच्या 6 जनपथ या निवास्थानी ही बैठक झाली होती. आमच्यामध्ये चांगल्या प्रकारे चर्चा झाली. भाजप कोणतेही चांगले काम करत नाही, त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. सगळे पक्ष एकत्र आले तर ते देशाच्या हिताचे होईल अशा प्रतिक्रीया नितीश कुमार यांनी दिल्या होत्या.

25 सप्टेंबरला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तेजस्वी यादव तसेच विरोधी पक्ष नेते हर‍ियाणामध्ये इंडियन नॅशनल लोकदलाच्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. चौटाला यांनी या रॅलीचे आयोजन केले आहे. शरद पवार तसेच एनसीचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला, शिरोमणी अकाली दलचे नेता प्रकाश सिंह बादल, सामाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव तसेच मुलायम सिंह यादव मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मालिक देखील रॅलीमध्ये सहभागी होतील. तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, तेलगु देशम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देखील या रॅलीचे आमंत्रण आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी