28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeव्हिडीओखारघरमध्ये 20 बळी घेतल्यानंतर शिंदे सरकार भानावर

खारघरमध्ये 20 बळी घेतल्यानंतर शिंदे सरकार भानावर

यापुढे दुपारच्या वेळेत 12 ते 5 दरम्यान मोकळ्या जागा, क्रीडांगणे, मैदाने, उघड्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांना बंदी; महाराष्ट्र भीषण सोहळ्यानंतर राज्य सरकारला उपरती; मंगलप्रभात लोढा यांनी दिली सरकारच्या GRची माहिती

खारघरमध्ये 20 बळी घेतल्यानंतर शिंदे सरकार भानावर आले आहे. यापुढे दुपारच्या वेळेत 12 ते 5 दरम्यान मोकळ्या जागा, क्रीडांगणे, मैदाने, उघड्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र भीषण सोहळ्यानंतर राज्य सरकारला उपरती झालेली आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सरकारच्या GRची माहिती दिली आहे. खारघर दुर्घटनेनंतरचा हा राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय म्हणावा लागेल.

महाराष्ट्र भीषण सोहळा हा खारघरमधील सिडकोच्या सेंट्रल पार्क मैदानात रणरणत्या उन्हात 42 अंश सेल्सिअस तापमानात पार पडला होता. सोहळ्या दरम्यान प्यायला पुरेसे पानी न मिळाल्याने तसेच अनेक तास उन्हात उघड्यावर राहिल्याने उष्माघाताने 13 जणांचा मृत्यू झाला असल्याची सरकारी माहिती आहे. प्रत्यक्षात ही बळींची संख्या 30 हून् अधिक असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता या दुर्घटनेतील चेंगराचेंगरीचे व्हिडिओही समोर येत आहेत. या घटनेतील अनेक रुग्ण अजूनही वेगवेगळया शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

 

या सर्व पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माध्यमांना सरकारच्या निर्णयाची माहिती दिली. त्यानुसार, यापुढे दुपारच्या वेळेत 12 ते 5 दरम्यान मोकळ्या जागेत कार्यक्रम न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी सरकारने जीआर काढला आहे. या नव्या GR मुळे आगामी निवडणूक प्रचारात अडथळे येण्याची तसेच विरोधकांवर अन्याय होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा : 

महाराष्ट्र भूषण : शिंदे सरकारच्या 42°© रणरणत्या उन्हातील इव्हेंटने घेतले 11 बळी

शिंदे सरकारचे म्हशीपेक्षा रेडकू मोठे !

फडणवीस पुन्हा येणार; पण पुढच्या मार्गाने की मागच्या दाराने, संजय राऊतांचा उपमुख्यमंत्र्यांना चिमटा

महाराष्ट्र भीषण सोहळ्यात पांच लाखांहून अधिक लाख लोक पाच ते दहा तास उन्हात होते. भर उन्हात पार पाडल्या गेलेल्या या कार्यक्रमात आयोजकांच्या ढिसाळ नियोजनाने निष्पाप लोकांचे बळी गेले.  त्यावरून विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अनेक नेत्यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे.

Political Rally in Afternoon, No Programme Political Rally, Open Space, Grounds. Maharashtra Bhushan

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी