33 C
Mumbai
Thursday, June 1, 2023
घरव्हिडीओसावरकर गौरव यात्रा अन् राहुल गांधींचा निषेध - एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस

सावरकर गौरव यात्रा अन् राहुल गांधींचा निषेध – एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस

"माफी मागायला मी काही सावरकर नाही, मी गांधी आहे," असे वक्तव्य करणाऱ्या कॉँग्रेस नेते व अपात्र केले गेलेले खासदार राहुल गांधी यांचा या पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी निषेध केला. सावरकरांचे जीवनकार्य जनतेला, नव्या पिढीला माहिती व्हावे म्हणून भाजप आता शिंदे सेनेच्या सहकार्याने राज्यात  सावरकर गौरव यात्रा काढणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सावरकरांचे जीवनकार्य जनतेला, नव्या पिढीला माहिती व्हावे म्हणून भाजप आता शिंदे सेनेच्या सहकार्याने राज्यात  सावरकर गौरव यात्रा काढणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. “माफी मागायला मी काही सावरकर नाही, मी गांधी आहे,” असे वक्तव्य करणाऱ्या कॉँग्रेस नेते व अपात्र केले गेलेले खासदार राहुल गांधी यांचा या पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी निषेध केला.

मालेगाव येथील कालच्या सभेत राहुल गांधी यांच्या सावरकरांविषयीच्या भूमिकेबाबत असहमती दर्शविणाऱ्या शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावरही एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता टीका केली. शिंदे म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान राहुल गांधींकडून होत आहे. त्याचा निषेध, धिक्कार करावा तेव्हढा थोडा आहे. त्याचा मी जाहीर  निषेध, धिक्कार करतो.

 

शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एकीकडे राहुल गांधींचा निषेध करेल व दुसरीकडे सावरकर गौरव यात्रा काढेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. या यात्रेतून सावरकरांनी केलेले कार्य हे समाजासमोर पुन्हा एकदा आम्ही आणू. असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा :

जाती-धर्माच्या नावे विभाजन करणारे सावरकर, गोळवलकर, हेडगेवार, देवरस, मोदी हे आऊटडेटेड; छत्रपती शिवराय तर आजही आदर्श!

Uddhav Thackeray : सावरकरांबद्दल आम्हाला आदर, राहूल गांधी याच्या विधानाशी सहमत नाही; उद्धव ठाकरे यांनी मांडली भूमिका

Tushar Gandhi : गांधी हत्येसाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला मदत केली तुषार गांधींचा खळबळजनक दावा

Savarkar Gaurav Yatra, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Rahul Gandhi, Shinde Fadnavis Condemns Gandhi

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी