33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeजागतिकतुर्की, सिरीयातील शक्तीशाली भूकंपात आतापर्यंत २३०० लोकांचा मृत्यू

तुर्की, सिरीयातील शक्तीशाली भूकंपात आतापर्यंत २३०० लोकांचा मृत्यू

दक्षिण पूर्व तुर्की (Turkey) आणि दक्षिण सिरीयामध्ये (Syria) सोमवारी झालेल्या शक्तीशाली भुकंपामध्ये (earthquake) २ हजार ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू (Death of people) झाला आहे. हा भूकंप ७.८ रिक्टरचा होता. या दुर्घटनेत अनेक इमारती उद्धस्त झाल्या असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बचावपथके इमारतींच्या मलब्यातून लोकांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढत आहेत. दोन्ही देशांमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले त्यामुळे कडाक्याच्या थंडीत आणि पावसात लोकांची मोठी धावपळ उडाली. दरम्यान भुकंपानंतर अद्यापही धक्के जाणवत आहेत. वेगवेगळ्या शहरांमध्ये बचावपथके उद्धस्त इमारतींमध्ये अडकलेल्या जखमी लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. (earthquake in Turkey, Syria in 2300 dead Many buildings were destroyed)

तुर्की आणि सीरियातील रुग्णालयांमध्ये लहान मुले आणि रुग्णांना बाहेर हलवावे लागले. तुर्कीतील एका नागरिकाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, त्याच्या परिसरातील तीन उमारती कोसळल्या आहेत. तुर्कीचे राष्ट्रपती तैयब एर्दोगन यांनी सांगितले की, भुकंपग्रस्त ठिकाणच्या अनेक इमारतींचा मलबा हटविण्याचे काम सुरू आहे, आम्ही आता निश्चितपणे किती लोकांचा मृत्यू झाला आणि किती जखमी झाले याबाबत ठोसपणे सांगू शकत नाही.

भुकंपाचा केंद्रबिंदु तुर्कीच्या दक्षिण पूर्व प्रांतातील कहरमनमारस येथे होता. या भूकंपाचे हादरे दूरपर्यंत जाणवले. दमिश्क येथे देखील भूकंपामुळे लोकांना रस्त्यावर धाव घ्यावी लागली. बेरुतमध्ये देखील हादरे जाणवले. तर सिरीयातील ज्या भागात भूकंप झाला त्या प्रदेशात गेल्या दशकभरापासून गृहयुद्धाची परिस्थिती आहे. हा भाग सरकार आणि विद्रोही यांच्यात वाटला गेलेला असून या भागात रशियाचे सैन्य तैनात आहे. तुर्कीच्या ज्या भागात भूकंप झाला आहे तेथे शरणार्थी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विरोधकांच्या ताब्यात असलेल्या सिरियाई भागात यु्द्धामुळे विस्थापित झालेले ४० लाख लोक राहतात. यातील अनेक जण मोडखळीस आलेल्या इमारतींच्या आसऱ्याने राहत होते.

व्हाईट हेल्मेट नाव्याच्या आपत्कालीन संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे की, येथे शेकडो कटुंबे इमारतींच्या मलब्यात अडकली आहेत. तर बचाव पथकांनी सांगितले की, अपुऱ्या सोई सुविधा असलेली रुग्णालये जखमीं लोकांनी भरुन गेली आहेत. एसएमएस आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, सैन्याच्या रुग्णालयांसह अनेक रुग्णालये खाली केली असून हा प्रदेश भुकंपाच्या मुख्य केंद्रकात येतो. सन १९९९ साली तुर्कीत झालेल्या अशाच एका भूकंपामध्ये १८ हजार लोकांचा मृत्यू झाला होता.

हे सुद्धा वाचा
मविआने उमेदवार मागे घेतल्यास टिळक कुंटुंबातील व्यक्तीला भाजपची उमेदवारी!

तुर्कस्तान, सीरिया हादरले : भूकंपात ५०० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू, ३४ इमारती जमीनदोस्त

गिरीश महाजनांच्या पुढाकाराने छत्रपती शिवरायांच्या नावाने भव्य स्पर्धा

अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षणानुसार भूकंपाचे केंद्र गजियातेप पासून 33 किलोमीटर दूर १८ किलोमीटर खोल होते. या प्रदेशात भूकंपाचे धक्के जाणवले. सर्वेक्षणानुसार काही काळानंतर 7.5 रिश्टरचा भूकंपाचा धक्का येथे जाणवला. या भूकंपाचे केंद्र या ठिकाणाहून १०० किमी दूर होते.
तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले की, हा वेगळा भूकंप होता, त्याच्या धक्क्यानंतर अनेक भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता आहे. सिरियाच्या अलेप्पो आणि हामा शहरासह तुर्कीतील दियारबाकीरपर्यंत हजारो इमारती कोसळल्याची माहिती समोर येत आहे.


तुर्कीतील भूकंपाने प्रभावित झालेल्या भागातून लोक बाहेर पडत आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होत अशून घटनास्थळी बचावपथके जाण्यास अडचणी निर्माण होत आहेत. लोकांनी रस्त्यावर येऊ नये असे आवाहन येथील प्रशासनाने केले असून ज्या लोकांची घरे कोसळली आहेत त्यांना येथील मस्जिदींमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. तर उत्तर पश्चिम सिरियामध्ये सीरियन सिव्हील डिफेंसने सांगितले की, या प्रदेशात अनेक लोक इमारतींच्या मलब्यात अडकले आहेत. अजमरिन या छोट्याशा शहरात अनेक लहानमुलांचे मृतदेह रुग्णालयात आणले आहेत.

तुर्कीच्या १० प्रांतात जवळपास १५०० लोकांचा मृत्यू तर जवळपास ८५०० लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सीरियाच्या आरोग्य खात्याने सांगितले की, मृत्यी झालेल्या लोकांची संख्या ४३० हून अधिक झाली असून १२८० लोक जखमी झाले आहेत. तर सीरियातील वंडखोरांच्या ताब्यातील प्रदेशात ३८० लोकांचा मृत्यू झाल्याचे व्हाईट हेल्मेटने म्हटले आङेत तर एसएमएमएसने मृतांची संख्या १३५ इतकी सांगितली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी