28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयनव्या सरकारच्या राज्यात चाललंय तरी काय...? 24 दिवसांत तब्बल 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नव्या सरकारच्या राज्यात चाललंय तरी काय…? 24 दिवसांत तब्बल 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

टीम लय भारी

राज्यात बळीराजाच्या आत्महत्येता मुद्दा पुन्हा प्रकर्षाने समोर येऊ लागला आहे. एकीकडे शिंदे – फडणवीस सरकार राजकारण आणि राजकीय गट विस्तारात दंग आहेत तर दुसरीकडे बळीराजा न्याय मिळत नसल्याच्या कारणामुळे आत्महत्या करीत आहे. गेल्या 24 दिवसांत तब्बल 89 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कटीबद्ध असलेल्या या नव्या सरकारच्या आणाभाकांचे काय असा प्रश्न सातत्याने समोर येत आहे.

दरवेळी अस्मानी किंवा इतर कोणत्या कारणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यावर संकट येऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकार मोठे निर्णय घेतले जातात, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या जातात. कर्जमाफी, शेतीमालाला योग्य भाव, आधुनिक तंत्रज्ञान असे एक ना अनेक प्रश्न हाताळत सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी वेगवेगळे पर्याय समोर आणून दिलासा दिला जातो. परंतु शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून हे चित्र काहीसे बदलल्याचे पाहायला मिळत आहे.

शिवसेना आमदारांच्या बंडानंतर राज्यात अखेर शिंंदे सरकार स्थापन झाले. सरकार स्थापनेला 24 दिवस उलटले तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचा कारभार हाकताना दिसत आहेत. राज्यात अजूनही कोणत्या खात्याला मंत्री न मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देणार कोण असा यक्षप्रश्न समोर उभा राहिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाही अशी शाश्वत दिली असली तरी अद्याप कृषीमंत्रीपदी कोणाचीच वर्णी लागलेली नाही त्यामुळे त्यांच्या या संकल्पनेचे तीन तेरा वाजत असल्याचे दिसून येत आहे.

मागील 24 दिवसांत सर्वाधिक आत्महत्या या औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. औरंगाबादमध्ये 23, त्यापाठोपाठ बीडमध्ये 13, यवतमाळमध्ये 12 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. परभणीमध्ये 6, जळगाव 6, जालना 5, बुलढाणा 5, उस्मानाबाद 5, अमरावती 4, वाशिम 4, अकोला 3, नांदेड 2 आणि भंडारा – चंद्रपूर येथे 2 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून महाविकास आघाडीच्या निर्णयाला स्थिगिती देत त्या त्या निर्णयावरच नव्याने आदेश काढण्यात व्यस्थ आहेत, त्यामध्ये शहर , विमानतळ यांच्या नामांंतराचा मुद्दा, आरे कारशेड, थेट सरपंच – नगराध्यक्ष निवडणूक इ. परंतु पुरामुळे आणि इतर कारणांमुळे प्रचंड नुकसान सहन कराव्या लागणाऱ्या शेतकऱ्याला अद्याप कोणताच दिलासा देण्यात आलेला नाही. खाते वाटप अजूनही झाले नसल्यामुळे दाद मागायची कुठे असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांना पडला आहे. केवळ आणि केवळ सत्तांतराच्या या नाट्यामुळे वेळीच प्रश्न न सुटल्याने राज्यातील 89 शेतकऱ्यांनी गेल्या 24 दिवसांत आत्महत्या केल्या असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा…

देशात ‘मंकीपाॅक्स’चा धोका वाढला, आरोग्य यंत्रणा अलर्टवर

मुंबई लवकरच होणार खड्डेमुक्त?

VIDEO : निर्भीड पत्रकार ‘लोकमान्य टिळक’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी