28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeआरोग्यदेशात 'मंकीपाॅक्स'चा धोका वाढला, आरोग्य यंत्रणा अलर्टवर

देशात ‘मंकीपाॅक्स’चा धोका वाढला, आरोग्य यंत्रणा अलर्टवर

टीम लय भारी

दिल्ली : जगाच्या चिंतेत भर घालणाऱ्या मंकीपाॅक्स या आजाराने आता भारतात सुद्धा चांगलाच शिरकाव केला आहे. आतापर्यंत भारतातील केरळ राज्यात बाहेरून आलेल्या दोन व्यक्तींना आणि तेथील आणखी एका व्यक्तीला मंकीपाॅक्स झाल्याचे समोर आले होते, परंतु देशाच्या राजधानीत दिल्लीमध्ये सुद्धा एक रुग्ण आढळून आला आहे. सदर व्यक्तीने कोणतीच परदेशी वारी केलेली नाही तरीही तपासणीत त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

पश्चिम दिल्लीतील 31 वर्षीय तरुणाला मंकीपाॅक्सची लागण लागली आहे. या तरुणाने कधीही परदेशी प्रवास केलेला नाही. या तरुणाला लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले, दोन दिवसांपूर्वीच या रुग्णाचा नमुना एनआयव्ही पुणे येथे पाठवण्यात आले, ज्यामध्ये त्याचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. दरम्यान दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयात नोडल केंद्र बनवण्यात आले आहे. ज्यामध्ये मंकीपाॅक्स बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

दरम्यान देशात मंकीपाॅक्स झालेल्या रुग्णांची संख्या आता चारवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्ण हा 31 वर्षीय पुरुष असून त्याने परदेशात प्रवास केला नाही. या रुग्णाला ताप आणि त्वचेवर जखम झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या रुग्णावर दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत, असे सांगण्यात आले आहे.

दिल्लीतील लोकनायक रुग्णालयात मंकीपॉक्सच्या संभाव्य धोक्याचा विचार करून सहा खाटांचा वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या वार्डमध्ये डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण आल्यावर रुग्णाची काळजी कशी घ्यायची याचे प्रशिक्षण सुद्धा दिले जात आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 16 जुलै रोजी सरकारने रुग्णालयाला मंकीपॉक्सचं ‘नोडल केंद्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा…

मुंबई लवकरच होणार खड्डेमुक्त?

VIDEO : निर्भीड पत्रकार ‘लोकमान्य टिळक’

भारतीय खेळाडू लवकरच परदेशातील T-20 लीगमध्ये खेळण्याची शक्यता

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी