30 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeसिनेमाराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे निधन

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे निधन

टीम लय भारी

मुंबई :- राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री ‘बालिका वधू’ फेम सुरेखा सीकरी यांचे निधन झाले आहे. सुरेखा सीकरी यांना आज सकाळी ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या मॅनेजरने माध्यमांना दिली. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या प्रदीर्घ काळापासून आजारी होत्या (National award winning senior actress Surekha Sikri passes away).

सुरेखा सिक्री यांना यापूर्वी नोव्हेंबर 2018 मध्ये देखील ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्यादरम्यान अभिनेत्रीला अर्धांगवायू झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शूटिंगदरम्यान त्या खाली कोसळून पडली होती, त्यानंतर अभिनेत्रीची तब्येत हळूहळू सुधारत होती. त्यातून त्या बऱ्यादेखील झाल्या. मात्र, जास्त काम करु शकल्या नाहीत.

राष्ट्रपती पदाच्या चर्चेवरून अतुल भातखळकरांचा शरद पवारांना खोचक टोला

दहावीचा निकाल 16 जुलैला जाहीर होणार; या वेबसाईटवर पाहू शकता निकाल

त्यांना 2020 मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये जवळपास 15 दिवस ट्रिटमेंट घेतल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावतच गेली.

सुरेखा यांनी आत्तापर्यंत नाटके, मालिका, चित्रपट सर्वच क्षेत्रात काम केले. 1978 सालच्या ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटविश्वात पदार्पण केले होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. त्यांना ‘तमस’ (1988), ‘मम्मो’ (1995) आणि ‘बधाई हो’ (2018) या चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत (Received National Award for Best Supporting Actress).

अमिताभ यांच्या बंगल्याबाहेर “बीग बी शो बिग हार्ट” म्हणत मनसेची पोस्टरबाजी

Actor Surekha Sikri dies of cardiac arrest

senior actress Surekha Sikri passes away
सुरेखा सीकरी

सुरेखा यांना सपोर्टिंग अभिनेत्री म्हणून तीन वेळा नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळाला आहे. सिनेमांशिवाय त्यांनी सांझा चूल्हा, सात फेरे : सलोनी का सफर आणि बालिका वधू यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सुरेखा यांना त्यांच्या ‘बालिका वधू’ या मालिकेमधल्या भूमिकेने घराघरात पोहोचवले होते. तर ‘बधाई’ हो या चित्रपटातली त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. या भूमिकेसाठी त्यांना 2018 साली राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. अभिनेत्री सुरेखा सिक्री यांना 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘बधाई हो’ या चित्रपटातील दादीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या व्हिलचेअरवरुन आल्या होत्या.

दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले होते. त्यांना 1989 साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. त्यांचे वडील भारतीय हवाई दलात होते तर आई शिक्षिका होती. त्यांनी हेमंत रेगे यांच्याशी लग्न केले. या दोघांना राहुल नावाचा एक मुलगाही आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी