टीम लय भारी
मुंबई : बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला, तर भाजपला बहुमत मिळाले. याच मुद्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला पालिकेच्या पहिल्याच सभेत, बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा असे म्हटले आहे ( Sanjay Raut’s appeal to BJP to merge Belgaum with Maharashtra).
महाराष्ट्रातील भाजपचे पुढारी म्हणतात की, भाजपचा भगवा बेळगाव महापालिकेवर फडकला. तर भाजपने बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव पालिकेच्या पहिल्या सभेतच मंजूर करावा असे राऊत म्हणाले.
Sanjay Raut : तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा
तसेच महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणाऱ्या भाजपने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा असे म्हणत राऊतांनी भाजपला डिवचले आहे. त्याचबरोबर बेळगाव एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला असे ही राऊत ट्विटमध्ये म्हणाले (Raut said in a tweet that he defeated the Belgaum Unification Committee).
MNS questions to Sanjay Raut : अग्रलेख लिहिण्यापलीकडे काय केलंत? मनसेचा संजय राऊतांना सवाल
Pune BJP seeks Sanjay Raut’s arrest over ‘threatening remark’
बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात आमचा भगवा बेळगावर फडकला.मग एक करा.पालिकेच्या पहिलया सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा.महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणारया भाजपाने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा!
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 8, 2021
बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपला 35 जागा, कॉंग्रेसला 10, अपक्ष 8, महाराष्ट्र एकीकरण समिती 4 आणि एम आय एमला 1 जागेवर विजय मिळाला होता.