टीम लय भारी
मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी मोठा निर्णय घेतला आहे. पडळकरांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या उलट वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम व गरजूंना मदत करून हा दिवस साजरा करण्याची विनंती पडळकरांनी त्यांच्या सहकारी मित्रांना केली आहे (Gopichand Padalkar took a big decision, social activities and requested his colleagues to help the needy).
सध्या राज्यातील पूरपरिस्थितीमुळे शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले. त्याचबरोबर कोरोना सारख्या महामारीमुळे ही लोकांचे अतोनात हाल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पडळकरांनी हा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबर रोजी पडळकरांचा वाढदिवस असतो. परंतु सध्याच्या परिस्थितीमुळे पडळकरांनी सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्त व कोरोनाग्रस्त कुटुंबियांना मदत करण्याची विनंती केली आहे.
त्याचबरोबर आपापल्या परिसरात रक्तदान शिबीर, सामाजिक उपक्रम व गरजूंना मदत करून हा दिवस व्यतीत करावा. तसेच सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन पडळकरांना वाढदिवसानिमित्त भेटायला न येता सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात. अशी विनंती पडळकरांनी त्यांच्या सहकारी मित्रांना केली आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
राज्यातील #पुरपरिस्थितीमुळे शेकडो लोकांची झालेली प्राणहाणी व #कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या भयानक परिस्थितीच्या गांभीर्याची जाणिव ठेवून #१_ऑक्टोबर रोजी मी माझा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून माझ्या सहकारी मित्रांनो आपण सामाजिक बांधीलकी ठेवून पुरग्रस्तांच्या, pic.twitter.com/ZV1n8dTqT4
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) September 30, 2021
Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांची मागणी, 1 लाख कोटी रकमेचा वापर सामान्य लोकांसाठी करा
BJP will get another opportunity to come to power in Maharashtra: Devendra Fadnavis