26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeराजकीयशिवसेना मंत्री संदिपान भुमरेंच्या भावाची कार्यकर्त्याला मारहाण; रस्त्याची तक्रार केल्याचा राग, आठ...

शिवसेना मंत्री संदिपान भुमरेंच्या भावाची कार्यकर्त्याला मारहाण; रस्त्याची तक्रार केल्याचा राग, आठ जणांविरोधात गुन्हा

टीम लय भारी

औरंगाबाद :  शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या भावाने कार्यकर्त्याला मारहाण केली आहे. रस्त्याच्या कामाची तक्रार केल्याने मारहाण करण्यात आली. रणजित नरवडे असे या मारहाण झालेल्या संबंधित व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात संदिपान भुमरे यांचे भाऊ राजू  भुमरे यांच्यासह आठ जणांवर पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे(Shiv Sena minister Sandipan Bhumare’s brother beat the activist)

गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Shivsena : देवेंद्र फडणवीसांचे आव्हान शिवसेनेने स्विकारले, आज देणार उत्तर

कामावर जाण्यात एसटी कर्मचाऱ्यांचं हित, जे भडकवतायत ते कुटुंब जगवायला येणार नाहीत – संजय राऊत

तक्रारीनंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रणजित नरवडे यांनी रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती. 2018 मध्ये रस्त्याचे काम न करताच बोगस बिल उचलल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले होते.

तक्रार केल्यानंतर घाईगडबडीने कामाला सुरुवात देखील करण्यात आली. मात्र याचा राग मनात धरून, संदिपान भुमरे यांचे भाऊ राजू  भुमरे यांनी आपल्याला लाथा, बुक्क्याने मारहाण केली, अशी तक्रार नरवडे यांनी केली आहे.

ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं रामदास कदम यांच्यावर अन्याय? संजय राऊत म्हणाले…

Didn’t think twice before getting into bed with Shiv Sena: Captain hits out at Congress

नरवडे हे भुमरेंच्या मामाचा मुलगा 

विशेष म्हणजे रणजित नरवडे हे संदिपान भुमरे यांचे नातेवाईकच आहेत. नरवडे हे भुमरे यांच्या  मामाचा मुलगा आहे.  राजू  भुमरे यांनी आपल्याच मामाच्या मुलाला मारहाण केली. घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणी  पाचोड पोलीस ठाण्यात संदीपान भुमरे यांचे भाऊ राजू  भुमरे यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी