29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रशहाजी बापूंनी ‘होयची मान डोलवली‘ - हरि नरके

शहाजी बापूंनी ‘होयची मान डोलवली‘ – हरि नरके

टीम लय भारी

मुंबईः काय झाडी…काय डोंगर …हाटेल फेम… शहाजी बापू पाटील सध्या प्रसिध्दीच्या झोतात आहेत. त्यांची आपल्याला कमी निधी मिळाल्याची कुरबूर सुरु होती. पण काल भर सभेत त्यांनी आपल्याला 265 कोटींचा निधी मिळाल्याचे होकारार्थी मान डोलवून कबूल केले. अशी प्रतिक्रिया प्राध्यापक हरि नरके यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

शहाजी बापू पाटलांनी बंडखोर आमदारांची वाट चोखाळली. त्यानंतर ते फोन वरुन कार्यकत्र्यांना सांगत होते. ‘लका म्या पक्षासाठी घरादाराची राखरांगोळी केली‘, माझी बायको पाटलाची सून असून, तिला नवं लुगडं घेवू शकत नाय. आपल्याला निधी मिळाला नाही, अशी ओरड करणारे शहाजी बापू पाटील काल, एका वृत्त वाहिनीवर बोलत होते. ‘मला पैशाची गरज ‘नाय. आपला 30 एकर ऊस हाय.

माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेच्या विशेष अधिवेशनात निधी वाटपाची यादीच वाचून दाखवली. त्यामध्ये त्यांनी कोणाला किती निधी दिला ते आकडेवारीसह सभागृहात सांगितले. सगळया आमदारांनी आपले आकडे मान्य केले. त्यातलेच एक आमदार शहाजी बापू पाटील हे होते. अजित पवारांनी शहाजी बापूंना ‘265 कोटी‘ रुपयांचा निधी दिल्याचे सांगितले. त्यावर बापूंनी होयची मान डोलवली. म्हणजेच त्यांनी चांगला निधी मिळाल्याचे कबूल केले. बंडखोर आमदारांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला जास्त निधी वाटप केल्याची ओरड केली होती. त्यापैकी शहाजी बापू पाटील हे एक होते.

यापूर्वी शहाजी बापूंनी एका वृत्त वाहिनीवर सांगितले होते की, बारामतीला 1500 कोटी आणि सांगोल्याला 156 कोटी निधी दिला. अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाणांच्या मतदार संघात जेवढा निधी दिला त्यामध्ये राज्यातील 50 तालुक्यांना निधी मिळाला असता. अडीच वर्षांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आमच्यावर भरभरुन अन्याय केला. हे आमचं दुखणं होतं, म्हणून आम्ही बंडखोरी केली.

हे सुध्दा वाचा:

भाजप – शिंदे सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला?

सिडकोच्या नियोजनावर फिरले पाणी; पालिकांचे दावे ठरले फोल

‘या‘ देशातील प्रत्येक घरात असते बंदूक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी