31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंनी केले 'ओबीसी 'आरक्षणाचे स्वागत

धनंजय मुंडेंनी केले ‘ओबीसी ‘आरक्षणाचे स्वागत

टीम लय भारी

बीडः राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ‘ओबीसी’ आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. महाविकास आघाडीच्या काळातच  काम झाल्याचे त्यांनी सांगितले. बांठिया आयोगाची स्थापना महाविकास आघाडीच्या काळात करण्यात आली. या आयोगाने न्यायालयाने घालून दिलेल्या नियमानुसार ट्रिपल टेस्ट केली. डाटा गोळा केला.

आज सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासह घेण्याचा आदेश दिला.यापूर्वी ओबीसी आरक्षणाच्या 27 टक्के प्रमाणे उमेदवार देऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, असे त्यांनी यावेळी सांगितले.ओबीसी आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत केले, असून ओबीसी समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व कायम राहावे, यासाठी आम्ही प्रयत्न केले असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.

राज्यात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी 20 जुलैला तसेच या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.  सुनावणीत बांठिया आयोगानुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारने हे आरक्षण टिकवण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती. आरक्षणासाठी लागणारा अहवाल सादर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने बांठिया आयोग नेमला होता.

हे सुध्दा वाचा:

शिवसेनेतील बंडखोरांनी ‘पक्षघटनेला‘च फासला हरताळ

कल्याण उपशहर प्रमुखावर शिंदे समर्थकाचा हल्ला

सत्ता संघर्षाच्या तिढयाला ‘राज्यपाल’ जबाबदार ?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी