31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeआरोग्यWild vegetables : श्रावण महिन्यातील औषधी रानभाज्या चाखायलाच हव्या

Wild vegetables : श्रावण महिन्यातील औषधी रानभाज्या चाखायलाच हव्या

पावसाळ्यात आपल्याला बाजारात अनेक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या दिसतात. त्यामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या देखील असतात. रानभाज्या या डोंगरावर तसेच उजाड जागेवर उगवतात. केवळ पावसाच्या पाण्यावर उगवणाऱ्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात.

पावसाळा सुरु झाला की, वातावरणात एक प्रकारचा सुखद गारवा येतो. जिकडे नजर जाईल तिकडे सगळीकडे हिरवाई दिसते. या हिरवाईत देखील अनेक वनस्पती आहेत. ज्या औषधी (Medicinal) गुणांनीयुक्त आहेत. पावसाळ्यात आपल्याला बाजारात अनेक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या दिसतात. त्यामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या देखील असतात. रानभाज्या या डोंगरावर तसेच उजाड जागेवर उगवतात. केवळ पावसाच्या पाण्यावर उगवणाऱ्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात. या रानभाज्या आपल्याला शुध्द स्वरुपात मिळतात. त्या आरोग्यासाठी अत्यंत हितकारक असतात. त्यांना किटकनाशकांची फवारणी केलेली नसते. या भाज्या ग्रामीण भागात आवडीने खाल्या जातात. कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात. त्या आरोग्यदायी असतात.

त्या पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या असतात. या भाज्या चवीला रूचकर आणि पौष्टिक असतात. आता श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात हमखास मिळणारी भाजी म्हणजे टाकळा ही भाजी दिसायला मेथीच्या भाजीप्रमाणे दिसते. तिची कोवळी रोपे भाजीसाठी आणली जातात. टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. ही भाजी त्वचा रोगावर अत्यंत गुणाकारी आहे. ही भाजी गुणाने उष्ण आहे. या भाजीच्या सेवनाने वात आणि कफदोष कमी होण्यास मदत होते. श्रावणात मिळणारी दुसरी भाजी म्हणजे कुरडूची भाजी, कुरडूची कोवळी पाने शिजवून त्याची भाजी करतात. दमा, कफ विकारावर ही भाजी अत्यंत गुणकारी समजली जाते.

हे सुध्दा वाचा

Azadi Ka Amrit Mahotsav : भारताच्या स्वातंत्र्यद‍िनाची तारीख 15 ऑगस्ट ठरवण्याचे कारण

Cabinet Expansion : उतावळ्या बंडखोरांना लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार सोसवेना !

राहूल गांधींचा करारी बाणा, नरेंद्र मोदींची केली चिरफाड

कुरडूची भाजी ही मूतखडा असलेल्या रुग्णांनी खायला हवी. त्यामुळे वेदना, जळजळ कमी होते. आणखी एक श्रावण आणि भाद्रपद महिन्यात मिळणारी भाजी म्हणजे कर्टोली. कर्टोली ही एक फळभाजी आहे. ती पावसाळ्यात उगवते. ही भाजी कारल्या सारखी असते. पण छोटी छोटी असते. तिची चव किंचीत कडू, तुरट असते. ही भाजी इतर भाज्यांच्या तुलनेने महाग मिळते. कर्टोलीची भाजी कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम घाट परिसरात मिळते. जुन ते सप्टेंबर महिन्यात ही भाजी मिळते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही भाजी वरदान आहे. तिच्या नियमीत सेवनाने रक्तातील सारख‍ नियंत्रित राहण्यास मदत होते. आणखी एक भाजी श्रावण महिन्यात मिळते ती म्हणजे कवला.

चिंचेच्या या भाजीची पाने चिंचेच्या पानांसारखी छोटीछोटी असतात. माळरानावर तसेच भात शेतीच्या बांधावर ही भाजी मिळते. या भाज्या फुले येण्यापूर्वीच खायला हव्या.  श्रावण आणि भाद्रपद‍ महिन्यात या भाज्या मिळतात. या सर्व भाज्या कांदा, लसूण, खोबऱ्याचा वापर करुन हिरव्या मिरचीमध्ये बनवतात. त्या चवीला अत्यंत रुचकर असतात. नैसर्गिक पद्धतीने उगवल्यामुळे आरोग्यासाठी चांगल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी