32 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणPWD : पीडब्ल्यूडी मंत्र्यांनी अध‍िकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

PWD : पीडब्ल्यूडी मंत्र्यांनी अध‍िकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची चाळण झाली आहे. त्यामुळे याची सोशल मीडियावर देखील जोरदार चर्चा सुरु आहे. या रस्त्याची स्थ‍िती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याची दखल घेतली आहे. त्यांनी अध‍िकाऱ्यांना या बाबत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची चाळण झाली आहे. त्यामुळे याची सोशल मीडियावर देखील जोरदार चर्चा सुरु आहे. या रस्त्याची स्थ‍िती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याची दखल घेतली आहे. त्यांनी अध‍िकाऱ्यांना या बाबत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकारक व्हावा यासाठी कोकणातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम 25 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण करण्यात यावे. सध्या या महामार्गावर खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डा की, खड्डयात रस्ता हेच कळत नाही. या महामार्गावर खड्डे भरण्याचे काम सुरु आहे.

ही कामे कंत्राटदारांकडून सुरू आहेत. ती अत्यंत जलद गतीने होणे गरजेचे आहे. ही कामे युद्धपातळीवर करा, अशा सूचना बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना आजच्या बैठकीत दिल्या. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती संदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली.

हे सुद्धा वाचा

Ajit Pawar Speech : अजितदादा म्हणाले, मी असा झापेन की…

Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांचा ‘ऐक’ नाथ होऊ नये,धनंजय मुंडेंची कोपरखळी !

Sanjay Raut : संजय राऊतांचा कोठडी मुक्काम वाढला

या बैठकीत शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, सुनील तटकरे, विनायक राऊत, प्रवीण दरेकर, भरत गोगवले, नितेश राणे, वैभव नाईक, राजन तेली, योगेश कदम, रव‍िशेट पाटील, शेखर निकम, किरण पावसकर, राजन साळवी, अन‍िकेत तटकरे,‍ आदिती तटकरे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव एस.एस.साळुंखे, सच‍िव पी.डी. नवघरे, राष्ट्रीय महामार्ग मुख्य अभ‍ियंता संतोष शेलार, कोकण विभागाचे मुख्य अभ‍ियंता एस. एन. राजभोग, वरिष्ठ अभ‍ियंता सुषमा गायकवाड, रत्नागिरीच्या अभ‍ियंता नाईक, रत्नागिरीचे कार्यकारी अभ‍ियंता जाधव आदी उपस्थित होते. या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी प्रत्येक आमदार आण‍ि खासदारांनी सूचना केल्या.

त्याचप्रमाणे संपूर्ण महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी ट्रॅफ‍िक वॉर्डन तैनात करण्याच्या सूचना वाहतूक विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यांच्या कामावर नजर ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन अभियंता नेमून त्यांची नावे शासनाच्या संकेतस्थळावर टाकण्याचे न‍िर्देश चव्हाण यांनी दिले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी