29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणअष्टविनायक दर्शन : सातवा गणपती पालीचा श्री बल्लाळेश्वर

अष्टविनायक दर्शन : सातवा गणपती पालीचा श्री बल्लाळेश्वर

गणपती हा विद्येचा देव आहे. गणपती हा बुद्धीचा देव आहे. आपल्याकडे कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात ही गणपतीच्या पूजनाने करतात. पालीचा गणपती हा अष्टविनायकांमधला सातवा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. बल्लाळाची कथा गणेश पुराणात तसेच मुदगुल पुराणामध्ये आहे.

गणपती हा विद्येचा देव आहे. गणपती हा बुद्धीचा देव आहे. आपल्याकडे कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात ही गणपतीच्या पूजनाने करतात. पालीचा गणपती हा अष्टविनायकांमधला सातवा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. बल्लाळाची कथा गणेश पुराणात तसेच मुदगुल पुराणामध्ये आहे. कल्याण नावाच्या व्यापाऱ्यांचा बल्लाळ हा सुपुत्र होता. लहानपणापासून त्याची विनायकावर श्रध्दा होती. त्याने गावातील इतर मुलांना भक्तीसाठी प्रवृत्त केले. त्यामुळे गावातील मुलांचे अभ्यास आणि घराकडे दुर्लक्ष होऊ लागले. हे पाहून त्याच्या पित्याचा क्रोध अनावर झाला. त्याने बल्लाळाच्या गणेशाला दुर अंतरावर फेकुन दिले. त्यानंतर बल्लाळाचे हाल केले. त्याला झाडाला टांगले.

बल्लाळाने गणेशाची आराधन केली. गणेश त्याला प्रसन्न झाले. त्यांच्या इच्छेनुसार पाषाणाच्या मुर्तीमध्ये तिथेच राहिले. ते बल्लाळेश्वर या नावाने ओळखले जाऊ लागले. बल्लाळाच्या पित्याने फेकून दिलेली ह‍िच मूर्ती म्हणजे बल्लाळेश्वर गणपती या नावाने प्रस‍िद्ध आहे.

हे सुद्या वाचा

Ramdev Baba : बाळासाहेबांचे राजकीय वारसदार शिंदेच, रामदेव बाबांकडून प्रतिक्रिया

Teacher day: महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना मिळणार द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बक्षीस

Mantralaya : ‘मंत्रालया’च्या नावाने अधिकाऱ्यांची ‘वसुली’ !

बल्लाळेश्वर गणपतीचे हे ठ‍िकाण रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली या गावामध्ये आहे. हे गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण आहे. बल्लाळेश्वराची पूजा सकाळी 11.30 पर्यंत स्वहस्ते करता येते. रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात आंबा नद‍िच्या सन्निध्यात हे स्वयंभु गणेश मंद‍िर आहे.

हे मंद‍िर पूर्वाभ‍िमुख असून, सुर्योदय होताच सूर्याची कोवळी किरणे मूर्तीवर येऊन पडतात. मंदिराच्या आवातरात मोठी घंटा असून, सभामंडपाला आठ खांब आहेत. पुढील गाभाऱ्यात दोन पायामध्ये मोदक धरुन बसलेल्या गणपतीची मूर्ती आहे. आतील गाभाऱ्याच्या वरील बाजूला घूमट आहे. त्यावर अष्टकोनी कमळ आहे. या गाभाऱ्यात बल्लाळेश्वराची डाव्या सोंडेची पाषाणाची मूर्ती आहे. मूर्तीचे कपाळ विशाल असून, डोळयात व नाभीमध्ये हिरे बसविलेले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी