30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराष्ट्रीयराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने देशवासीयांना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

आज संपूर्ण देशात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण आहे आणि याचेच औचित्य साधून भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंध देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आज संपूर्ण देशात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण आहे आणि याचेच औचित्य साधून भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंध देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांनी ट्वीट करून देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या, त्या म्हणाल्या, ‘गणेश चतुर्थीच्या संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा. विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ति गजानन हे ज्ञान, सिद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. माझी त्याच्या चरणी कामना आहे की तुम्हा सर्वांना आयुष्यात सुख, शांति आण‍ि समृद्धी लाभो’.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एका संस्कृत श्लेाकाचा वापर करून ट्वीटद्वारे जनतेला गणेश चतर्थीच्या शुभेच्छा दिल्या, ते म्हणाले, ‘गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिेक शुभेच्छा’.

गृहमंत्री अमित शहा यांनीही देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या शभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ‘देशाच्या सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपति बाप्पा मोरया!’.उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनीही जनतेला शुभेच्छा दिल्या. आपल्या संदेशात ते म्हणाले, ‘गणेश चतुर्थीच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा. हा सण विविध जाती आणि धर्मांच्या लोकांना एकत्र आणतो आणि भारताच्या गौरवशाली परंपरेचे प्रतिनिधित्व करतो. सर्वांना चांगले आरोग्य, सुख, शांति आणि समृद्धी लाभो हीच माझी गणरायाचरणी प्रार्थना’.गणेश चतुर्थीला आजपासून देशभरात मोठया उत्साहात आणि जल्लोषात सुरूवात झाली. गणेश मूर्तींचे विर्सजन ९ सप्टेंबर होईल.

हे सुद्धा वाचा

गणेश चतुर्थी व्रत : गणेशोत्सवाचा उत्साह पोहोचला शिगेला

Ashtavinayaka Darshan : आठवा गणपती महडचा ‘वरदविनायक’

गणेश चतुर्थी व्रत : गणेशोत्सवाचा उत्साह पोहोचला शिगेला

मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि शासकीय यंत्रणानी सार्वजनिक ठिकाणी गणेश उत्सव साजरा करण्यावर निर्बंध लादण्यात आले होते परंतु हया वर्षी कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने सरकारने ते निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे लोकांमध्ये आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुमारे १३० वर्षांपूर्वी सुरूवात झाली. बाळ गंगाधर टिळक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेव्हाच्या ब्रिटीश शासनकर्त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणून त्यांच्या मनामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी