29 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमहाराष्ट्रकोकणAshtavinayaka Darshan : आठवा गणपती महडचा 'वरदविनायक'

Ashtavinayaka Darshan : आठवा गणपती महडचा ‘वरदविनायक’

अष्टविनायकांचा महिमा अगधा आहे. अष्टविनायकांवर भक्तांची अपार श्रद्धा आहे. त्यामुळे नेहमीच ही मंदिरे गजबजलेली असतात. गणपती हे संकटाचा नाश करणारे दैवत आहे. तसेच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे दैवत आहे. रायगड जिल्ह्यातील महड या गावी अष्टविनायकांपैकी आठव्या गणपतीचे म्हणजेच वरदविनायकाचे मंदिर आहे.

अष्टविनायकांचा महिमा अगधा आहे. अष्टविनायकांवर (Ashtavinayaka) भक्तांची अपार श्रद्धा आहे. त्यामुळे नेहमीच ही मंदिरे गजबजलेली असतात. गणपती हे संकटाचा नाश करणारे दैवत आहे. तसेच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे दैवत आहे. रायगड जिल्ह्यातील महड या गावी अष्टविनायकांपैकी आठव्या गणपतीचे म्हणजेच वरदविनायकाचे मंदिर आहे. या गणपतीची गाभाऱ्यात जाऊन पूजा करु शकतो. या गणपतीची मूर्ती ही सिंहारुढ आहे. हे मंदिर हेमांडपंथी आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी, गाभारा जूनाच पेशवे कालिन आहे.

वरदविनायक हा समृद्धी आणि यश देणार आहे. येथील मूर्ती ही स्वयंभू आहे. धोंडू पौढकर यांनी ही मूर्ती 1690 मध्ये तलावामध्ये मिळाली. तर 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे मंदिर बांधले व महड हे गाव देखील वसवले. या मंदिराच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. 8 फूट बाय 8 फूट असलेल्या या मंदिराला 25 फूट उंचीचा कळस आहे. या कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे. हे मंदिर पुर्वाभिमुख आहे. या मूर्तीच्या शेजारी अखंड ज्योत देवत असते. हा दिवा 1892 पासुन पेटता आहे.

कथा :

फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला. त्याला मूलबाळ नसल्याने तो दु:खी होता. तो आपल्या राणीसह अरण्यात गेला. त्याचे दु:ख जाणून विश्वाम‍ित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला. मग राजाने उग्र तपश्चर्या सुरु केली. त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला. तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल असा त्यांने राजाला वर दिला. काही दिवसांनी राजाला पुत्र झाला. त्याचे नाव रुक्मांगद ठेवले. तो मोठा झाल्यावर राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपवला. त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला.

एकदा रुक्मांगद शिकारीसाठी रानात भटकत होता. तो वाचक्नवी ऋषींच्या आश्रमात गेला. त्याला ऋषींच्या पत्नीचे नाव मुकुंदा होते. मुकुंदा पाणी देतांना त्याच्यावर ती अनुरुक्त झाली. परंतु त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मुकुंदेने ‘तू कुष्टरोगी होशील’ असा रुक्मांगदाला शाप दिला. शाप मिळताच सुंदर कांती असलेल्या रुक्मांगदाचे शरीर कुष्टरोगाने विद्रूप झाले होते. दु:खी झालेला रुक्मांगद आरण्यात भटकत होता. त्यावेळी त्याला नारदमुनी भेटले. त्यांनी त्याला गणेशाची आराधना करायला सांगितले. त्याने गणेशाची आराधना केली. त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कदंब नगरातील त‍िर्थात  स्नान केले. तो रोग मुक्त झाला.

हे सुद्धा वाचा

VIDEO : अष्टविनायक दर्शन : पाचवा गणपती ओझरचा ‘ विघ्नेश्वर’

VIDEO : अष्टविनायक दर्शन : चवथा गणपती रांजणगावचा ‘महागणपती’

अष्टविनायक दर्शन : सातवा गणपती पालीचा श्री बल्लाळेश्वर

तर इकडे मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रुप घेतले व मुकुंदेची इच्छा पुर्ण केली. त्यांच्यापासून मुकुंदेला पुत्र झाला. त्याचे नाव गृत्समद तो ऋग्वेदातील मंत्रांचा कर्ता आहे. पंरतु त्याच्या जन्माची कथा सर्वाना महित झाल्यामुळे लोक त्याचा तिरस्कार करु लागले. त्यामुळे त्याने आईला शाप दिला. त्या पापक्षालनासाठी तो पुष्पक वनात तप करु लागला. त्याने विनायकाची आराधना केली. त्यामुळे विनायक प्रसन्न झाला. तेच भद्रक वन म्हणजे पुष्पक वन म्हणजे आजचे महड हे अष्टविनायकाचे ठिकाण होय. गृत्समद हा गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक समजला जातो. पुराण काळात महडचे नाव मणिपूर (‍मण‍िभद्र) होते. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली-खालापूर येथे आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी