27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeआरोग्यLumpy Skin : जनावरांना 'लम्पी' आजाराचा धोका

Lumpy Skin : जनावरांना ‘लम्पी’ आजाराचा धोका

जनावरांना होणाऱ्या 'लम्पी' या त्वचा रोगाचा धोका वाढला आहे. लम्पी स्कीनमुळे 22 जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जनावरांना होणाऱ्या ‘लम्पी’ (Lumpy Skin) या त्वचा रोगाचा धोका वाढला आहे. लम्पी स्कीनमुळे 22 जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धुळे, जळगावमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. अनेकदा जनावरांच्या गोठयात गोचीड, माशा असतात. त्यामुळे जनावरांना या आजाराची लागण होते. जनावरांच्या डोके, मान, पाय, छाती, पाठ, कास येथील त्वचेवर ते 5 से.मी. व्यासाच्या गाठी येतात. पायावर सूज आल्याने जनावर लंगडते. एवढेच नाहीतर यामुळे जनावरांची तहान-भूक कमी होऊन दुध उत्पादनावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजे आहे. दरवर्षी जनावरांना हा त्त्वचेचा आजार होतो.

Lumpy Skin : जनावरांना 'लम्पी' आजाराचा धोका

राज्यात एक महिन्यापासून हा आजार वाढला आहे. विशेष म्हणजे या आजाराची लागण माणसाला देखील झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पशु पालकांनी काळजी घेण्याची गरज आहे. भविष्यात धोका वाढू नये याची काळजी घेण्याचे आव्हान तज्ञांनी केले आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. जळगावमध्ये या आजाराचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे.

हे सुद्धा वाचा

Yakub Memon : याकूब मेमन कोण होता ?

Beed Fraud News : संतापजनक! मयत व्यक्तीच्या खात्यातील पैसे बँकेने हडपले

Inspirational Story: ऑक्सफर्ड मधून पासआउट झालेल्या मराठमोठया तरूणीने शेयर केला आजोबांचा प्रेरणादायी प्रवास

राज्यात 6 सप्टेंबरपर्यंत सुमारे 22 जनावरे या आजारामुळे दगावली आहेत. जळगावमध्ये 12, नगरमध्ये 3, पुणे 3, बुलढाणा 1, तर अमरावतीमध्ये 3 जनावरे दगावली आहेत. पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या आजारामध्ये जनावरांच्या पायाला सूज येते. जनावरे लंगडतात. जनावरांची तहान- भूक कमी होते. त्यामुळे दुध उत्पादनावर त्याचा पर‍िणाम होतो. या आजराची लागण झालेल्या जनावराला इतर जनावरांपासून दूर ठेवावे. जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा. जनावरांच्य अंगावर गोमाशा बसणार नाहीत याची काळजी घ्यावी. ‍

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी