30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रAditya Thackeray : आदित्य ठाकरे म्हणाले, सरकार पडेल आणि मंत्रीमंडळ विस्तार होईल

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे म्हणाले, सरकार पडेल आणि मंत्रीमंडळ विस्तार होईल

राज्याला पुढे न्यायचे, राज्याचे भले करायचे यासाठी फुटलेले आमदार बाहेर गेलेच नाहीत, त्यांना राक्षसी महत्त्वाकांक्षा होत्या त्यामुळे ते बाहेर पडले. राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. मात्र हे सरकार पडेल आणि त्यानंतर देखील सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरूच राहतील, असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला. आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावळी त्यांनी शिंदे गट आणि राज्यपालांवर कडाडून टीका केली.
यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राला एवढे राजकीय राज्यपाल मी पाहिलेले नाहीत. पी.सी. अलेक्झांडर यांच्यासह अनेक राज्यपालांना मी भेटलेलो आहे. पण असे राज्यपाल पाहिले नाहीत, त्यांनी सत्ता पालटून टाकली, आम्हाला सत्तेतून बाहेर काढले, आम्ही सत्तेत असताना विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊ दिली नाही, त्यानंतर सत्ताबदल होतात लगेच निवडणूक घेतली. बारा आमदारांचा प्रश्न तसाच ठेवला. आता सुद्धा शिवाजी महाराजांचा अपमान, म. फुले यांचा अपमान, असे जरी त्यांचे सतत चालू असले तरी. राज्यपालांना वाचवण्यासाठी वेगवेगळी स्टेटमेंट केली जात आहेत. राज्यपालांच्या वक्तव्यावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी अशी स्टेटमेंट केली जात आहेत. जर केंद्र सरकार महाराष्ट्रव्देष्टे नसेल तर ते राज्यपालांना बदलतील.
हे सुद्धा वाचा :
Eknath Shinde : कामाख्या देवीला रेड्याचे बळी देतात का ?, एकनाथ शिंदे काय म्हणाले ऐका!
अभिनयच नव्हे तर शिक्षणात देखील या सेलिब्रिटींचा आहे डंका

Baba Ramdev : ‘महिलांनी काही घातले नाही तरी त्या चांगल्या दिसतात’

आदित् ठाकरे म्हणाले, हे सरकार, मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे, ते सत्तेच्या खुर्चीला चिकटून बसले आहे. पण सत्तेत आल्यानंतर जनतेची कामे करायची असतात. ओला दुष्काळ जाहीर करा आमची मागणी आहे, सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. तरुण बेरोजगारांचे प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. पण ओला दुष्काळ जाहीर होत नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले. सीमावादाबद्दल त्यांना विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, कर्नाटकने सोलापूर मागितले आहे, मात्र यामागे राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्याला बगल देण्यासाठी अशा वेगवेगळ्या चर्चा केल्या जात असाव्यात अशी देखील शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी