33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रउदयनराजे भाजप नेत्यांना म्हणाले, तुम्हाला लाज वाटत नाही का ?

उदयनराजे भाजप नेत्यांना म्हणाले, तुम्हाला लाज वाटत नाही का ?

देशाचे प्रमुख राष्ट्रपती असतात. तर राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात, पण राज्यपालच शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यांच्या विधानावर पांघरून घालणाऱ्यांना लाज वाटत नाही का, असा संतप्त सवाल यावेळी उदयनराजे भोसले यांनी केला.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी देखील शिवरायांबाबत वादग्रस्त विधाने केली होती. त्यामुळे राज्यभरात संतापाची मोठी लाट उसळी आहे. शिवरायांचे थेट 13 वे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवरायांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत राज्यपालांना हटविण्याची मागणी देखील केली होती. तरी देखील राज्यपालांबाबत कोणतीही भूमिका न घेतल्यामुळे उदयनराजे आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी रायगडावर आक्रोश मेळावा घेत भाजपच्या नेत्यांवर त्यांनी जोरदार टीका केली.

राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या नेत्यांनी देखील शिवरायांबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. एका न्यूज चॅनलवर बोलताना भाजपचे प्रवक्ते सुंधाशु त्रिवेदी यांनी ‘शिवरायांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली’ होती असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर भाजपनेते मंगलप्रभात लोढा यांनी देखील एकनाथ शिंदे यांची तुलना शिवरायांनी आग्र्यावरून केलेल्या सुटकेशी केली. त्यामुळे भाजप आणि राज्यपालांच्या विरोधात राज्यभरात आंदोलने आणि निदर्शने देखील करण्यात आली. दरम्यान उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यांबाबत आक्षेप घेतला होता. यावेळी त्यांना अश्रु अनावर झाल्याचे देखील पहायला मिळाले.

शनिवारी (दि. 3) रोजी खासदार भाजपचे खासदार छत्रपती छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रायगडावर आक्रोश मेळावा घेत भाजपच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, देशाचे प्रमुख राष्ट्रपती असतात. तर राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात, पण राज्यपालच शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यांच्या विधानावर पांघरून घालणाऱ्यांना लाज वाटत नाही का, असा संतप्त सवाल यावेळी उदयनराजे भोसले यांनी केला.
हे सुद्धा वाचा
मंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी!
जत तालुक्यातील 42 गावांना ‘म्हैसाळ’चे पाणी; कर्नाटकच्या कुरघोडीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही
बाबा रामदेव भेसळसम्राट; पतंजली ब्रँडचे तूप नकली – भाजपा खासदाराचा आरोप

उदयनराजे म्हणाले, शिवाजी महाराजांनी सर्वधर्मियांना एकत्र केले. मात्र आता राजकीय पक्ष स्वार्थी झाले आहेत. आता देश पुन्हा विकृत लोकांच्या हातात गेला आहे, हे सांगताना खंत वाटते. आता तुम्ही लोक या लोकशाहीचे राजे आहात, तुम्ही लोकच देशाला या विकृत लोकांच्या हातून बाहेर काढू शकता असे देखील उदयनराजे यावेळी म्हणाले. राजकीय नेत्यांकडून शिवाजीमहाराजांबद्दल तेढ निर्मान केली सर्वधर्मसमभावाचा विचार केवळ स्वार्थासाठी केला जात आहे. शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाचा संदेश सर्व जातीधर्माचे लोक आनंदाने रहावेत यासाठी दिला, त्यासाठी त्यांनी लढा दिला. मात्र त्याच शिवरायांचा देशात आज अवमान केला जात आहे.

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी