33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराष्ट्रीयमंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी!

मंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी!

मंदिरात जाताना तुम्ही मोबाईल फोन सोबत घेऊन जाता का?? तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. चेन्नई उच्च न्यायालयाने तामिळनाडू राज्यातील सर्व मंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी घातली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने रका याचिकेवरील निवाड्यात तामिळनाडूतील मंदिरांमध्ये मोबाईल फोनच्या वापराबाबत हा मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यातील मंदिरांची शुद्धता आणि पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे न्यायालयाचे म्हटले आहे. त्यासाठीच उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी घातली आहे. न्यायमूर्ती आर. महादेवन आणि न्यायमूर्ती जे. सत्यनारायण प्रसाद यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

यासंदर्भातील याचिकेत म्हटले होते, की भाविक त्यांच्याकंडील मोबाईल फोनने मूर्तींचे फोटो काढून घेतात, जे मंदिरांच्या नियमांच्या विरोधात आहे. तिरुचेंदूर मंदिरात मोबाईल फोन वापरण्यास बंदी घालावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती. त्यावर निकाल देताना उच्च न्यायालयाने नमूद केले, की गुरुवायूरमधील श्री कृष्ण मंदिर, मदुराईमधील मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर आणि तिरुपतीमधील श्री व्यंकटेश्वर मंदिर येथे यापूर्वीच मोबाईल फोन बंदी लागू आहे. या प्रत्येक मंदिराच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी मोबाईल फोन जमा करण्यासाठी स्वतंत्र सुरक्षा काउंटर आहे. त्यामुळे मंदिराची शुद्धता आणि पावित्र्य राखले जाते. त्याच धर्तीवर आता राज्यातील मंदिरात मोबाईल फोनसाठी सेफ्टी डिपॉझिट काउंटर तयार करून मंदिर आवारात मोबाईल वापरण्यास मनाई करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.

हेही वाचा :

मोदी सरकारचा चीनवर डिजिटल स्ट्राईक, ४३ मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी

हिंदूंची भारताबाहेरील मंदिरे आणि त्यांच्या भव्यतेचा इतिहास

UPI Payment : इंटरनेटशिवाय UPI द्वारे वीज बिल भरू शकता! जाणून घ्या सोपी प्रक्रिया

यासोबतच उच्च न्यायालयाने संपूर्ण तामिळनाडूमध्ये हा नियम लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी संबंधित विभागालाआदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने या आदेशाचे लवकरात लवकर पालन करावे, असे म्हटले आहे. लोकांची गैरसोय होण्यापासून वाचवण्यासाठी, मंदिरांमध्ये फोन डिपॉझिट लॉकर बसवावेत आणि आदेशाचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. दरम्यान, या मोबाईल बंदीमुळे वयस्कर भाविकांच्या त्रासात भर पडणार असून आता आधी मोबाईल ठेवण्यासाठी पैसे मोजायचे आणि पुन्हा आपल्या माणसांना शोधण्यासाठी वेळ घालवावा लागणार आहे, असे आक्षेप घेतले जात आहेत. मंदिरात फोटो काढण्याबाबत सख्त पावले उचलायला हवी होती. त्याऐवजी सरसकट बंदीने गैरसोय होईल, असा दावा केला जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी