33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रसर्वात मोठी बातमी : संजय राऊत म्हणतात, भाजप आणि आपचे सेटिंग!

सर्वात मोठी बातमी : संजय राऊत म्हणतात, भाजप आणि आपचे सेटिंग!

याक्षणाची सर्वात मोठी बातमी आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे, की आप आणि भाजप यांच्यात पूर्ण "सेटिंग" आहे. आम आदमी पक्षाला दिल्ली राहू द्यायची आणि त्यांनी भाजपला गुजरात राखण्यासाठी मदत करायची, अशी ही सेटिंग असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दुपारी भाजप पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

याक्षणाची सर्वात मोठी बातमी आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे, की आप आणि भाजप यांच्यात पूर्ण “सेटिंग” आहे. आम आदमी पक्षाला दिल्ली राहू द्यायची आणि त्यांनी भाजपला गुजरात राखण्यासाठी मदत करायची, अशी ही सेटिंग असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दुपारी भाजप पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

गुजरात निवडणूक निकालाबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, की गुजरातचे निकाल अपेक्षितच आहेत. त्यात धक्कादायक असे काहीच नाही. जे निकाल येऊ पाहत आहेत, त्याचे मला आजिबात आश्चर्य वाटत नाही. आपने दिल्ली ताब्यात घेऊन गुजरात भाजपसाठी सोडावी, असा जणू समजोता झाल्याचा जनतेला संशय आहे. या दोन्ही पक्षांमधील स्पष्ट समजूतदारपणाचा म्हणजे समजनेवालोको इशारा काफी असल्याचेच जणू राऊत यांनी सूचित केले.

हे सुद्धा वाचा

गुजरात : भाजप मोडणार सर्वाधिक जागांचा विक्रम, तर काँग्रेसचाही सर्वात कमी जागांचा विक्रम होणार!

हिमाचल प्रदेशात काँग्रेसने ओलांडला बहुमताचा टप्पा; भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा फटका!

क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा पिछाडीवर; जाणून घ्या गुजरातचे लेटेस्ट अपडेट्स कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर

गुजरातमध्ये भाजप तब्बल 160चा आकडा गाठताना दिसत आहे. दुसरीकडे काँग्रेसची कामगिरीही अतिशय खालावताना दिसत आहे. निवडणूक निकालाचे कल पाहता, आपच्या उमेदवारांनी पूर्णतः काँग्रेसच्या वाट्याची मते खाल्लेली दिसत आहेत. दुरंगी लढतीत भाजपाला नाकीनऊ आणणाऱ्या काँग्रेसची आप रिंगणात उतरल्याने झालेल्या तिरंगी लढतीत पार वाताहात होताना दिसत आहे.

ताज्या निकालानुसार, दाहोदमधून भाजपचे कनैयालाल बच्चूभाई किशोरी विजयी झाले आहेत.

पाटीदार बहुल अमरेलीमध्येही काँग्रेसचा धक्कादायक पराभव होताना दिसत आहे. काँग्रेस नेते परेश धनानी यांची धक्कादायक पराभवाकडे वाटचाल दिसून येत आहे. ते भाजप उमेदवाराच्या तुलनेत ते 5,600 पेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर आहेत. यापूर्वी त्यांनी अमरेली विधानसभा मतदारसंघातून सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता.

अहमदाबादमधील नरोडा येथून पायल कुकरानी या मोठी आघाडी घेताना दिसत आहेत. 2002 च्या गोध्रा नरोडा पाटिया हत्याकांडातील 16 दोषींपैकी एक असलेल्या मनोज कुकरानी याच्या त्या कन्या आहेत. 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी मनोज कुकरानीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती; पण सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी