33 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण काळाच्या पडद्याआड

लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचे फणसवाडी शनिवारी दुपारी वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

सोळावं वरीस धोक्याचं.., आंबा आलाय पाडला, पावणा… ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला…अशा शेकडो लावण्या ज्यांनी अजरामर केल्या अशा लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचे फणसवाडी शनिवारी दुपारी वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.  त्यांच्या पश्चात पश्चात धाकटा मुलगा, सून, मोठ्या मुलाची पत्नी, नातवंडे असा परिवार आहे. . आज संध्याकाळी मरिन लाइन्स येथे अंत्यसंस्कार होणार आहे. सुलोचना चव्हाण यांचा जन्म १३ मार्च १९३३ रोजी मुंबईत झाला होता. यावर्षीच त्यांना मानाचा असा पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. खर्जातल्या आवाजात ठसकेबाज लावण्या सुलोचना चव्हाण यांनी गायल्या, त्यांच्या लावण्यांना रसिकांचा तुफान प्रतिसाद लाभला.

सुलोचना कदम असे त्यांचे माहेरचे नाव होते, मुंबईत त्यांचे बालपण गेले, एका सामान्य चाळीतील कुटुंबात त्या वाढल्या. लहानपणापासूनच त्यांना कलाक्षेत्राची आवड होती. पुर्वी मेळे व्हायचे या मेळ्यात त्यांनी भूमिका करायला सुरुनवात केली. मराठीसह उर्दु नाटकांमध्ये देखील त्या भूमिका करत होत्या. त्यानंतर वयाच्या नवव्या दहाव्या वर्षापासून त्या गयनाकडे वळाल्या. खरे तर त्यांना गायनाचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण मिळाले नव्हते. गाणी ऐकुन त्यांनी गायनाचा रियाज केला.

लग्नाआधी त्यांनी ७० चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले होते. के. सुलोचना या नावाने त्या गायन करायच्या. आचर्य अत्रे यांच्या हीच माझी लक्ष्मी या चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांचा पार्श्वगान केले. त्यानंतर कलगीतुरा या चित्रपटासाठी त्यांनी लावणी गायली. शाम चव्हाण यांनीच त्यांना लावणी गायन शिकवले. पुढे १९५३ साली त्या शाम चव्हाण यांच्याशी विविहबद्ध झाल्या.

हे सुद्धा वाचा

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील गेस्ट लिस्ट आली समोर

बीसीसीआयच्या निवडसमितीच्या अध्यक्षपदी व्यंकटेश प्रसाद ?

पीनट बटरमुळे मधुमेहाचा धोका टळतो ?, जाणून घ्या

हिंदी चित्रपटसृष्टीतील  मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर अशा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या गायकांसोबत देखील सुलोचना यांना गाण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांनी हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी भाषांमध्ये देखील भजन, गझल गायल्या. सुलोचना यांना महाराष्ट्र शासनाने त्यांना दोन वेळा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविले, तसेच गंगा-जमना पुरस्कार, पुणे महापालिकेचा राम कदम पुरस्कार, राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार देखील त्यांना मिळाला.

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी