33 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रअरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका; संभाजी भिडेंचे वादग्रस्त...

अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका; संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान

अरबी समुद्रात (Arabian Sea) छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक (Chhatrapati Shivaji Maharaj’s memorial) उभारण्यास शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी विरोध केला आहे. अरबी समुद्रात महाराजांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका, असे वादग्रस्त विधान संभाजी भिडे यांनी केले आहे. तसेच शिवजयंती, जिजाऊ मॉसाहेबांची जयंती देखील तिथीनुसार साजरी व्हावी, असे त्यांनी म्हटले आहे. गडकोट मोहीमेच्या सांगता समारंभात जुन्नर (जि.पुणे) येथे भिडे बोलत होते. तसेच शिवरायांची जयंती हिंदु पंचांगाच्या तिथीनुसार झाली पाहिजे असे देखील ते यावेळी म्हणाले. (Sambhaji Bhide’s opposition to Chhatrapati Shivaji Maharaj’s memorial in the Arabian Sea)

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतिने गडकोट महिमांचे आयोजन केले जाते. या मोहीमेत भिडे यांचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. त्यांना धारकरी असे संबोधले जाते. जुन्नर येथे अशाच गडकोट मोहिमेच्या सांगता समारंभात भिडे यांनी अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल तसेच शिवजयंतीबद्दल विधान केले.

हे सुद्धा वाचा

विधान परिषद पदवीधर निवडणूकीत भाजपने खाते उघडले; कोकणात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

जितेंद्र आव्हाडांना कधीही अटक होणार ; अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले

मंत्र्यांचे चोचले पुरविण्यासाठी होणार १००० कोटींची उधळपट्टी !

यावेळी बोलताना संभाजी भिडे म्हणाले, शिवछत्रपतींचे स्मारक समुद्रात करणार, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणार, पण ते स्मारक करण्याचा बेशरमपणा करु नका. राज्याभिषेकानंतर हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. त्यानंतर शिवशक स्थापन झाला. शिवछत्रपतींनी पंचांगानुसार शिवशक सुरु केला. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी देखील हे लक्षात घेऊन शिवशकाचा उल्लेख केला पाहिजे.

जिजाऊंचा जन्म पौर्णिमेला झाला!
यावेळी बोलताना संभाजी भिडे यांनी जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीबद्दल देखील विधान केले. भिडे म्हणाले, जिजामाता यांचा जन्म १२ जानेवारीला झाला नाही. त्यांचा जन्म पौर्णिमेला झाला. तीच तिथी मानली पाहिजे. असे देखील ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी