31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमुंबईसर्वसामान्यांसाठी बातमी! लिंबाचे दर कडाडले; वाचा सविस्तर...

सर्वसामान्यांसाठी बातमी! लिंबाचे दर कडाडले; वाचा सविस्तर…

सततच्या होणाऱ्या हवामान बदलामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. थंडीच्या महिन्यातही सकाळी गारवा आणि दुपारी उन्हाचे चटके यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्याचप्रमाणे वातावरणातील उष्णताही वाढल्याने शीतपेये, लिंबूपाणी पिण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात अचानक लिंबूंची मागणी वाढली आहे. दरम्यान, घाऊक बाजारात २०० ते ३०० रुपये शेकडा या दराने लिंबू मिळू लागल्याने किरकोळ बाजारात प्रती लिंबू पाच रुपये दराने विकला जात आहे. (Lemon price Hike)

थंडीचा काळ संपला नसला, तरी वातावरणात उकाडा वाढत असल्याने लिंबूपाण्याला मागणी वाढली आहे. परिणामी लिंबूंच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात पन्नास ते ऐंशी रुपये शेकडा या दराने लिंबू विकले जात होते. परंतु मागणी वाढल्याबरोबर २०० ते ३०० रुपये प्रति शेकडा असे दर झाले आहेत. घाऊक बाजारातच हे दर इतके वाढले असल्याने, किरकोळ बाजारातही लिंबूंच्या किमतीत तातडीने वाढ झालेली दिसून येते. किरकोळ बाजारातही लिंबू पाच रुपयांना एक या दराने विकत घ्यावे लागत आहे.

मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमधील घाऊक भाजीपाला बाजारात, आंध्र प्रदेश, नगरमधून मोठ्या प्रमाणात लिंबू येत असतात. सध्या लिंबाच्या दहा गाड्या दररोज बाजारात येत आहेत. त्यात सोमवारी तर बाजारात केवळ २०८ क्विंटल लिंबांची आवक झाली. शाकाहारी जेवण असो वा मांसाहारी, रोजच्या जेवणात लिंबांची आवश्यकता भासतेच. उन्हाचा तडाखा वाढल्याने लिंबू सरबताची मागणी वाढून लिंबांना अधिक भाव आला आहे. मात्र, वातावरणातील बदलांमुळे फेब्रुवारी महिन्यातच ही स्थिती असेल तर, एप्रिल-मे महिन्यापर्यंत काय होणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे. आता उन्हाळा संपेपर्यंत तरी लिंबांचे दर असेच चढे राहतील, अशी माहिती लिंबांच्या व्यापाऱ्यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा : जिऱ्याच्या फोडणीला बसतोय महागाईचा तडका; हे आहे कारण

Good Health : निरामय आरोग्यासाठी ‘लिंबू’ खाणे हितकारक

पंतप्रधानांचे लाडके उद्योगपती अदानीशेठचा बाजार उठतोय!

त्याच बरोबर उन्हाळ्यात ऑफिसला जाणारे किंवा रोजंदारीवर काम करणारी लोकं सहसा लिंबू सरबत पितात. मात्र लिंबाच्या दरात वाढ झाल्याने लिंबू सरबतच्या दरातही वाढ झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी लिंबू सरबतच्या गाड्या लावणाऱ्यांनी १० रुपयांऐवजी १५ रुपयांना १ ग्लास केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी