31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयमहाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी; खटला सात सदस्यांच्या खंडपीठासमोर जाणार?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी; खटला सात सदस्यांच्या खंडपीठासमोर जाणार?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Uddhav Thackeray vs Eknath Shinde) मंगळवार (दि.14) आणि बुधवारी दोन दिवस सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडली. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, रेबीया खटला, विधानसभा अध्यक्ष, उद्धव ठाकरेंचा राजीनामा, राज्य घटनेतील दहावी सुची अशा विविध मुद्द्यांवर ठाकरे गट आणि शिंदे गटांच्या वकीलांनी युक्तीवाद केला. ठाकरे गटाने ही केस सात सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपविण्याची मागणी केली. तर शिंदे गटाकडून त्याला विरोध करण्यात आला. दोन्ही बाजूंनी या खटल्यात जोरदार युक्तीवाद करत कायद्याचा किस पाडला. शिंदे गटाकडून विधिज्ञ हरीष साळवे यांनी युक्तीवाद करताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्याचे सांगितले. दरम्यान आता गुरुवारी या खटल्यावर सुनावणी होणार असून हा खटला सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवायचा किंवा नाही यावर सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय घेऊ शकते. (Supreme Court hearing on Uddhav Thackeray vs Eknath Shinde Maharashtra power struggle tomorrow)

कालच्या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तीवाद केला होता. तर आज शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ हरीष साळवे आणि निरज कौल यांनी युक्तीवाद केला. उद्या गुरुवारच्या सुनावणीत शिंदे गटाकडून युक्तीवाद करण्यात येणार आहे.

आज शिंदे गटाकडून हरीष साळवे यांनी युक्तीवाद करताना म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. खरेतर त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 जून पर्यंत मुदत होती. मात्र बहुमत सिद्ध करण्यास वेळ असताना देखील त्यांनी राजीनामा दिला, 16 आमदारांमुळे सरकार पडले नाही असा युक्तीवाद त्यांनी केला. त्यानंतर शिंदे गटाचे वकील निरज कौल यांनी खोटे कथानक रचून हा खटला सात सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपविता येणार नाही असा युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी किहोतो प्रकरणाचा दाखला दिला. ज्या नेत्यावर आमदारांना विश्वास नाही तो नेता मुख्यमंत्रीपदी कसा असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. रेबिया प्रकरणानुसार इथे नव्या अध्यक्षांनी बहुमत सिद्ध केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पंक्षांतर्गत वाद हा लोकशाहीचा भाग असून पक्षाच्या नेत्याला हटवण्यासाठीचा हा संघर्ष आहे. त्यामुळे घटनेच्या १० व्या अनुसूचीनुसार कारवाई करता येणार नाही, असा युक्तीवाद देखील कौल यांनी केला.

हे सुद्धा वाचा

बेकायदेशीर भंगाराच्या गोदामात सापडला शिवाजी महाराजांचा चोरीला गेलेला पुतळा

शिक्षकांचे शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी होण्याचे स्वप्न भंगले; शिक्षकांमधूनच पदे भरण्याची मागणी

हृदयस्पर्शी: IPS लेकीने केला DGP वडिलांना सॅल्यूट; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

शिंदे गटाकडून आज युक्तीवाद केल्यानंतर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले की, राज्यपाल मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अधिवेशन बोलवू शकत नाही. उपाध्यक्षांनी जेव्हा 16 आमदारांवर अपात्रतेची नोटीस बजावली होती तेव्हा त्यांच्यावर अविश्वास ठराव नव्हता. विधानसभेचे सभागृह सुरू असताना अविश्वास प्रस्ताव आणता येतो, मात्र या प्रकरणात इ-मेल पाठवून अविश्वास प्रस्ताव आणल्याचे सिब्बल म्हणाले. शिंदे गटातील आमदारांकडून 10 व्या सुचीचा गैरवापर झाल्याचे देखील ते म्हणाले. हे सरकार असंवैधानिक असल्याचा युक्तीवाद सिब्बल यांनी यावेळी केला.

 

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी