26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeराजकीयआम्ही वैचारिक विरोधक आहोत, शत्रू नाही; ठाकरेंबाबत फडणवीसांचे सूचक विधान

आम्ही वैचारिक विरोधक आहोत, शत्रू नाही; ठाकरेंबाबत फडणवीसांचे सूचक विधान

शिवसेना पक्षफुटीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात कटुतता कायम आहे. मात्र ठाकरे वैचारिक विरोधक आहेत. परंतु शत्रू नाहीत, असे सूचक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले आहे. फडणवीस हे राजकीय विरोधक असले तरी ते ठाकरेंना मित्र मानतात. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे मुख्य नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी केलेल्या विधानावर भाष्य करण्यास विचारले असता फडणवीस यांनी हे विधान केले. यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणातील वैमनस्य कधीतरी थांबले पाहिजे कारण ते राज्यासाठी चांगले नाही, असेही फडणवीस म्हणाले. (Fadnavis Thackeray)

“मी नेहमीच म्हटले आहे की, आम्ही वैचारिक विरोधक आहोत. आम्ही शत्रू नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात वैमनस्य निर्माण झाले आहे, पण ते चांगले नाही, हे कधीतरी थांबले पाहिजे. मी हे यापूर्वी वारंवार सांगितले आहे, प्रत्येक वेळी मला कोणी विचारले की, आम्ही शत्रू नाही,” असे फडणवीस गुरुवारी दुपारी म्हणाले.

फडणवीस यांनी शिवसेनेत फूट पाडल्याच्या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आरोपावर भाष्य करण्यास विचारले असता ते म्हणाले, “संजय राऊत मला खूप मानतात, त्यामुळे त्यांची इच्छा असेल तर त्यांना तसे म्हणू द्या.” त्याचप्रमाणे पुढे उद्धव ठाकरेंवर ताशेरे ओढत फडणवीस म्हणाले की, “काहीही शक्य आहे हे मी माझ्या राजकारणातील अनुभवातून शिकलो आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील अशी कल्पना कोणी केली होती का? पण त्यांना ती खुर्ची मिळाली ना, असा मिस्कील सवालही त्यांनी उपस्थित केला.

भाजपचे सर्व उच्चपदस्थ नेतृत्व आता पोटनिवडणुकीचा प्रचार करत असल्याच्या विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या टिप्पणीवर फडणवीस म्हणाले, “निवडणुका प्रत्येकाने गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. मते मागायला लाज कसली? मागील पोटनिवडणुकीतही आम्ही जोरदार प्रचार केला होता. आता त्यांना शरद पवारांसह सर्व उच्चपदस्थांना मैदानात आणावे लागले आहे. तुम्ही शरद पवारांना पोटनिवडणुकीसाठी प्रचार करताना पाहिले आहे का?

हे सुद्धा वाचा : २००० कोटींनी न्याय विकत घेतला ; देवेंद्र फडणवीसही व्यवहारात सामील

निवडणूक आयोग मोदींचा गुलाम ; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शिंदे-फडणवीस यांच्या चंद्रकांत पाटील यांना तातडीने बैठकीच्या सूचना

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी