30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयनिवडणूक आयोग मोदींचा गुलाम ; उद्धव ठाकरेंचा घणाघात

निवडणूक आयोग मोदींचा गुलाम ; उद्धव ठाकरेंचा घणाघात

निवडणूक अयोग्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुलाम आहे आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या निर्णयाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे ते म्हणाले. आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे याविरोधात दाद मागणार आहोत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. जोवर एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण होत नाही, तोवर धनुष्य बाण या चिन्हावर निवडणूक आयोगाने आपला निर्णय राखून ठेवावा, असा युक्तिवाद आम्ही न्यायालयात केला होता, असे उद्धव ठाकरे म्हणाले. (Election Commission Modi’s slave; Uddhav Thackeray’s death)

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, येत्या काही महिन्यांत मुबई महानगरपालिकेच्या निवडणूका जाहीर होतील, अशी आम्ही अपेक्षा करतो. निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय आमच्यासाठी अनपेक्षित होता. पंमुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. आता लवकरच ते निवडणूक घोषित करतील, असे ठाकरे म्हणाले. हा सर्व घटनाक्रम म्हणजे सुनियोजित कट असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते धनुष्य बाण हे चिन्ह त्यांना मिळेल, असे पूर्वीपासूनच सांगत आले आहेत. मुंबईचे नियंत्रण दिल्लीश्वरांच्या हातात असावे, अशीच त्यांची इच्छा आहे. महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे गटाचे मशाल हे चिन्हदेखील त्यांना मिळाले तर आश्चर्य वाटणार नाही, अशा बोचऱ्या शब्दांत ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगाने शेण खाल्ले आहे. एखाद्या राजकीय पक्षाची वैधता निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या आधारावर कशी काय ठरवता येऊ शकते. हे असेच जर असेल तर लोकप्रतिनिधींना विकत घेतले जाऊ शकते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीबाहेर ओपन कारमधून भाषण

टी. एन. शेषन : निवडणूक आयोगाला बळकट करणारा वाघ !

चोरीचे धनुष्य बाण घेऊन निवडणुकीला सामोरे या..! उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी