36 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeमुंबईअनिल देशमुखांना अडणीत आणणारे परमविर सिंग पुन्हा पोलीस दलात येणार

अनिल देशमुखांना अडणीत आणणारे परमविर सिंग पुन्हा पोलीस दलात येणार

अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसूलीचा सनसणाटी आरोप करणारे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमविर सिंग यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. मात्र आता त्यांचे निनंबन मागे घेण्यात आल्याचे वृ्त्त समोर आले आहे. त्यामुळे परमविर सिंग आता पून्हा पोलिस दलात येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमविर सिंग यांनी 100 कोटी रुपयांच्या वसूलीचा आरोप केला होता. या प्रकरणात अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या आणि ईडीने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली होती. परमविरसिंग यांच्या अडणीत वाढ झाल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले होते. परमविर सिंग य़ांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता. मात्र ते पोलिसांच्या हाती आले नाहीत.

हे सुद्धा वाचा

धक्कादायक: नशा करणाऱ्या बॉडीबिल्डरने जन्मदात्यांवरच केले चाकूने वार

छंद डिग्र्यांचा: डॉक्टरेटनंतर 77 टक्क्यांनी उत्तीर्ण होत मुख्यमंत्र्यांनी मिळवली ‘ही’ पदवी

अजित पवारांच्या गोपनीय दौऱ्याची चर्चा; सत्तासंघर्षाच्या निकालावर “नो कॉमेंट्स”

परमविर सिंग मुंबईचे पोलिस आयुक्त असताना मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवण्याचे प्रकरण, त्यानंतर मनसुख हिरेन हत्या, सचिन वाझे आणि त्यांचे साथीदार यांचा सहभाग अशा मोठ्या घटना देखील समोर आल्या होत्या. या प्रकरणात सचिन वाझे सध्या कारागृहात आहे. तर परमविर सिंग यांच्यावर देखील त्या काळात ठाणे, नवी मुंबईत खंडणीप्रकरणातील गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर परमविर सिंग यांना डिसेंबर 2021 मध्ये परमविर सिंग यांचे पोलिस दलातून निलंबन करण्यात आले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी