29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमनोरंजन'गदर२' की 'जवान' कोण तोडणार 'बाहुबली'२ चा रेकॉर्ड?

‘गदर२’ की ‘जवान’ कोण तोडणार ‘बाहुबली’२ चा रेकॉर्ड?

दहिहंडीच्या दिवशी अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होतात नवनवीन रेकॉर्ड तयार करत आहे. या चित्रपटाने एका दिवसात जगभरात १२९. ६ कोटी रुपयांची कमाई केली. जगभरात हिंदी सिनेमांच्या एका दिवसाच्या कमाईतील ही सर्वात मोठी रक्कम मानली जाते. एका दिवसात १०० कोटींचा पल्ला पार करणाऱ्या ‘जवान’ला आपला प्रतिस्पर्धी ‘गदर २’ आणि ‘बाहुबली – द कन्क्लूजन’ चा आजतगायतचा रेकॉर्ड मोडता येणार आहे का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

‘बाहुबली – द कन्क्लूजन’ हा २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली- द बिगनिंग’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. ‘बाहुबली – द कन्क्लूजन’ २०१७ साली प्रदर्शित झाला होता. जगभरात या चित्रपटाची दहा कोटी तिकिटे विकली गेली. जागतिक पातळीवर ‘बाहुबली – द कन्क्लूजन’ने १८ अब्ज ६० कोटी रुपयांची कमाई केली. जगभरात सर्वात जास्त कमाई करणारा ‘बाहुबली – द कन्क्लूजन’ने हा पहिला भारतीय चित्रपट ठरला.

‘बाहुबली – द कन्क्लूजन’मुळे अभिनेता प्रभासचं करियर बहरलं. तर तब्बल २३ वर्षानंतर ‘गदर२’ने अभिनेता सनी देओलच्या फ्लॉप करियरला नवी दिशा दिली. याआधी २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर-एक प्रेम कथा’ चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिली होती. त्यानंतर अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल दोघांच्याही करियरला उतरती कळा लागली. दोघांनाही चांगल्या बेनरचे चित्रपट मिळेनासे झालेत.

शाहरुखनं चार वर्षांच्या ब्रेकनंतर यंदाच्या वर्षापासून प्रेक्षकांसमोर येण्यास सुरुवात केली. शाहरुख खानचा वर्षाच्या सुरुवातीला ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शित झाला. ‘पठाण’नं जगभरात ४५० कोटी रुपयांची कमाई केली. ‘गदर२’ ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. चार आठवड्यात सिनेमानं ५१० कोटी रुपये कमावलेत. आता ‘जवान’ एका दिवसांत १०० कोटी पार करत असल्यास शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या ४५० कोटी रुपयांचं रेकॉर्ड मोडेल का, ‘जवान’ चित्रपट ‘गदर२’च्या ५१० कोटी रुपयांच्या पुढे जाईल का, याचा अंदाज चित्रपट व्यापार तज्ज्ञ वर्तवत आहेत.

हे सुद्धा वाचा 
एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ आणि एकनाथ शिंदेच झाले ट्रोल
नकाश अझीझच्या ढोल ताशाच्या गजरातील ‘मोरया’ गाण्यावर तुम्ही ही धराल ठेका
साखरपुढ्याला लगबगीने सगळे आले, आता वऱ्हाडी म्हणून कोण कोण येणार परिणीती-राघव चढ्ढाच्या लग्नाला ?

‘बाहुबली- द बिगनिंग’ चित्रपटानंतर दोन वर्षानंतर २०१७ साली ‘बाहुबली – द कन्क्लूजन’ प्रदर्शित करण्यात आला. प्रेक्षकांना दोन वर्ष ‘बाहुबली – द कन्क्लूजन’ची उत्कंठा लागून होती. या चित्रपटामुळे दक्षिणात्य चित्रपटाचा दर्जा जगभरात उंचावला गेला. सद्यस्थितीत जागतिक पातळीवर सर्वात जास्त कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत दक्षिणात्य चित्रपट पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. ‘बाहुबली – द कन्क्लूजन’, ‘केजीएफ’ आणि ‘आरआरआर’ चित्रपटांनी पहिल्या तीन क्रमांकावर बाजी मारली आहे. ‘पठाण’ या यादीत नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे ‘गदर२’ आणि ‘जवान’ या दोघांपैकी कोणता चित्रपट ‘बाहुबली – द कन्क्लूजन’चं रेकॉर्ड मोडतोय, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी