26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमुंबईमनसेचे आमदार राजू पाटील संतापले, नावापुढे डॉक्टर लावणाऱ्या आयुक्त, खासदारांना लोकांची नस...

मनसेचे आमदार राजू पाटील संतापले, नावापुढे डॉक्टर लावणाऱ्या आयुक्त, खासदारांना लोकांची नस सापडली नाही!

कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या रुक्मिणी बाई रुग्णालयात प्रसूतीसाठी आणलेल्या महिलेला दाखल न केल्याने या महिलेची प्रसूती एका हातगाडीवर झाली. ही घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या रुग्णालयाचा गैरकारभार पुन्हा समोर आला आहे.

या घटनेची गंभीर दखल या महापालिकेचे आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांनी घेतली की नाही माहीत नाही. मात्र मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू उर्फ प्रमोद पाटील यांनी घेतली आहे. ‘ महापालिका प्रशासन गेंड्याच्या कातडीचे झाल्याने असे प्रकार घडत आहेत. आयुक्त, खासदार नावापुढे डॉक्टर ही पदवी लावतात. पण यांना लोकांच्या आरोग्याची, लोकांची नड याची नस सापडली नाही. या घटनेत महापालिकेने तातडीने जबाबदार व्यक्तींना निलंबित केले नाही तर आम्ही मनसे स्टाईलने उत्तर देऊ’ असाही इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे.

हे ही वाचा 

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; पुसेसावळीत जाळपोळ, दंगल

कल्याण -डोंबिवलीचे राजकारण कूस बदलणार; खासदारकीसाठी कथोरे चर्चेत, महापौर पदावर भाजपचा डोळा

मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात बनावट पनीरचा धंदा तेजीत!

कल्याणच्या स्कायवॉकवर एक गर्भवती महिला वेदणा होत असल्याने त्रस्त होती. विकास ठाकरे नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याला तिची दया आली. त्याने तिला शनिवारी रात्री रुक्मिणी बाई रुग्णालयात प्रसूतीसाठी आणले. पण रुग्णालय प्रशासनाने तिला दाखल न केल्याने हातगाडीवर तिने एका मुलीला जन्म दिला. नंतर बाळ आणि बाळंतिणीला पालिकेच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पण माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी