29 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeराजकीयअशोक चव्हाणांशी संबंधित साखर कारखाने आयकर विभागाच्या रडारवर

अशोक चव्हाणांशी संबंधित साखर कारखाने आयकर विभागाच्या रडारवर

टीम लय भारी

बुलढाणा: सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित साखर कारखाने आता आयकरच्या रडारवर आले आहेत. बुलढाणा अर्बन पतसंस्थेने दिलेल्या कर्जाची आयकर पथकाकडून चौकशी सुरु आहे. बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी याविषयीची माहिती दिली आहे. काल रात्रीपासून चौकशी सुरु असल्याची माहिती मिळतेय (Ashok Chavan on target of Income Tax Department).

बुलढाणा अर्बन पतसंस्थेच्या मुख्यालयात बुधवार दुपारपासून आयकर विभागाचं अकरा जणांचं पथक चौकशी करत आहेत. बुलढाणा अर्बन पतसंस्थेने अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील चार कारखान्यांना कर्ज दिलं आहे. या चार कारखान्यांसंदर्भात ही चौकशी केली जात असल्याची माहिती बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी दिली. गेल्या २४ तासापासून पथक चौकशी करत आहेत. सुभाष शुगर हातगाव, एव व्ही शुगर उमरी आणि भाऊराव शुगर १, भाऊराव शुगर २ हे नांदेड येथील चार कारखाने आहेत. या कारखान्यांना दिलेल्या कर्जाशी संबंधित आयकर पथक चौकशी करत आहेत.

Ashok Chavan : आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधानांनी कष्टकऱ्यांना 7500 रूपये द्यावेत

आमदार शरद रणपिसे यांचे निधन, अशोक चव्हाणांनी व्यक्त केला शोक

चंद्रकांत पाटलांनी दिला होता सूचक इशारा

चंद्रकांत पाटील नांदेडमध्ये देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांना ईडी किंवा आयकर विभागाची कारवाई नांदेडच्या नेत्यांवर होणार का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला होता. त्यावेळी त्यांनी स्मितहास्य केलं. मी काही त्या तपास यंत्रणांचा अधिकारी नाही आहे. पण माझ्या हसण्यावरुन काय समजायचं ते समजा, असा सूचक इशारा दिला. मात्र, चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली होती. चंद्रकांत पाटलांचा रोख नेमका कोणावर आहे? कोणत्या नेत्यावर आता कारवाई होणार? यावरुन चर्चांना उधाण आलं होतं.

मंत्री अशोक चव्हाणांना पाच बहिणींकडून आल्या राख्या, त्या मुलींकडून बांधल्या

I-T dept questions bank officials over loans given to sugar mill linked to ex-Maha CM Ashok Chavan

अजित पवारांच्या नातेवाईकाच्या घरी ईडीचा छापा

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीकडून झाडाझडती सुरू आहे. जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरी ईडीच्या पथकाकडून छापा टाकण्यात आला आहे. दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारा संदर्भात ही छापेमारी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. जगदीश कदम हे दौंड शुगरचे संचालक आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली होती त्यानंतर आता अजित पवारांच्या मामेभावाच्या घरावर ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी