25 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रआंबेघरमधील मृतांचा आकडा 15 पर्यंत वाढेल, मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

आंबेघरमधील मृतांचा आकडा 15 पर्यंत वाढेल, मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

टीम लय भारी

सातारा:- साताऱ्यातील आंबेघरमध्ये दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. भूस्खलन झाल्याने येथील अनेक घरे दबली गेली आहेत. मागील काही तासापासून एनडीआरएफच्या टीमने बचाव कार्य सुरु केल्यानंतर आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. आंबेघरमधील मृतांचा आकडा 15 पर्यंत वाढेल, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे (Balasaheb Patil has informed that the death toll in Ambeghar will increase).

अतिवृष्टीमुळे येथील आजूबाजूच्या अनेक भागात पाणी साठल्याने आंबेघर घटनास्थळी पोहचण्यासाठी बराच वेळ लागत आहे. येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि नागरिकांना मदत करता यावी यासाठी या ठिकाणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी भेट दिली, तसेच तेथील लोकांचे सांत्वन करुन धीर दिला. शासन तुमच्या पाठिशी असून शासनातर्फे सर्वतोपरी मदत मिळवून देणार असल्याचे यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले (Balasaheb Patil said that the government is behind you and will provide all possible help from the government).

डॉ. जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा, तळीये गाव वसविण्याचे काम ‘म्हाडा’ करणार

मंत्री यशोमती ठाकूर धावल्या अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी

आंबेघरमध्ये अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले असून यामध्ये 15 नागरिक दगावण्याची शक्यता आहे. आतापर्यत एनडीआरएफच्या मदतीने 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यातील 6 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून ढिगाऱ्यातून उर्वरीत मृतदेह काढण्याच्या सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या आहेत.

साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आंबेघरला भेट देवून एनडीआरएफच्या टीमकडून सुरु असलेल्या बचाव कार्याची माहिती घेतली.

Balasaheb Patil has informed death Ambeghar increase
एनडीआरएफच्या टीमकडून बचाव कार्य सुरु आहे

मंत्री जयंत पाटलांचे पाय जमिनीवर, पूरग्रस्तांच्या समस्या घेतल्या जाणून

Maharashtra: 13 bodies recovered from two landslide sites in Satara

24 तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आंबेघर गावापासून सात किलोमीटर आधी पावसामुळे पूल वाहून गेल्याने घटनास्थळावर यंत्रणा पोहोचणे मुश्किल झाले होते. मात्र चौदा तासानंतर 24 जुलै रोजी अकरा वाजता एनडीआरएफची टीमन घटनास्थळावर पोहोचली

त्यानंतर युद्धपातळीवर येथील मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, यावेळी एनडीआरएफला काही ग्रामस्थ देखील घटनास्थळी मदत करत आहेत (Some villagers are also helping NDRF on the spot).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी