29 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रडॉ. जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा, तळीये गाव वसविण्याचे काम 'म्हाडा' करणार

डॉ. जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा, तळीये गाव वसविण्याचे काम ‘म्हाडा’ करणार

टीम लय भारी

मुंबई:- दरड कोसळल्यामुळे महाड तालुक्यातील अख्खं तळीये गाव उद्ध्वस्त झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावची परिस्थिती पाहिली. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या पुनर्वसनाचा शब्दही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला होता. त्यानंतर आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झालेले तळीये हे गाव पूर्ण वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे (Jitendra Awhad announcement establish Taliye village)

कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती’, असं ट्वीट करुन जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाने घेतलेल्या जबाबदारीची माहिती दिली आहे. महाविकास आघाडी सरकार आणि पर्यायाने जितेंद्र आव्हाड यांच्या या निर्णयामुळे तळीये गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे (Jitendra Awhad tweeted about the responsibility taken by MHADA).

मंत्री यशोमती ठाकूर धावल्या अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी

मंत्री जयंत पाटलांचे पाय जमिनीवर, पूरग्रस्तांच्या समस्या घेतल्या जाणून

जितेंद्र आव्हाड म्हणाले, गावाच्या पुनर्वसनाचे ठिकाण अजून ठरलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी तळीये गावकऱ्यांना सांगितले, शासन तुमच्या मागे उभे आहे. धोकादायक परिस्थितीत जी घरे आहेत, ती सुरक्षित ठिकाणी वसवणे आवश्यक आहे. ही सुरुवात आहे. आम्ही स्वत:हून हा निर्णय घेतला. शरद पवारसाहेबांशीही चर्चा झाली, त्यावेळी त्यांनी सूचना केली होती म्हाडाने अशी घरे बांधून द्यावी. त्यामुळे आम्ही घरे बांधून देणार आहोत. छान सुंदर, कोकणातले गाव उभे राहील, हे म्हाडा करेल असे जितेंद्र आव्हाड म्हणाले (Jitendra Awhad said that MHADA will build a village in Konkan)

Jitendra Awhad announcement establish Taliye village
जितेंद्र आव्हाड

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास तळिये गावात पोहोचले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, मुख्यसचिव सीताराम कुंटे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री भरपावसात चिखलातून वाट काढत घटनास्थळी पोहोचले (The Chief Minister reached Taliye village around 2.15 pm today).

Jitendra Awhad announcement establish Taliye village
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळिये गावात पोहोचले

अशोक चव्हाण यांनी सर्वपक्षीय खासदारांना लिहिले पत्र

Taliye hillslide washout: Thackeray wipes tears of dazed survivors

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी येताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घटनेची माहिती दिली. ही माहिती घेत असतानाच जोरदार पावसाला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांनी भरपावसात हातात छत्री धरून स्थानिकांचे म्हणणं ऐकून घेतले. त्यांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला.

गेल्या काही वर्षांपासूनचा हा अनुभव आहे. आक्रित म्हणावे असे आक्रित घडत आहे. पावसाळ्यात अनपेक्षित घटना घडत आहे. त्यामुळे त्यातून शहाणे होण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षापासून चक्रीवादळानेच पावसाळा सुरू होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक वस्त्या डोंगरदऱ्यात आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. आम्ही फक्त पुनर्वसनाचा विचार करणार नाही. तर त्याचा आराखडा तयार करणार आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले (We will not just think of rehabilitation. So we are going to prepare a plan, said Chief Minister Uddhav Thackeray).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी