33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयसंगमनेरमधील कॅप्टन भारत भूषण मोरे यांची लेफ्टनंट कर्नल पदी निवड

संगमनेरमधील कॅप्टन भारत भूषण मोरे यांची लेफ्टनंट कर्नल पदी निवड

टीम लय भारी 

संगमनेर : संगमनेरच्या वरुडी पठार भागातील निवृत्त सैनिक रामचंद्र मोरे यांचा मुलगा कॅप्टन भारतभूषण मोरे (Bhushan More) यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट कर्नल पदी निवड झाली आहे. लहानपणापासूनच सैन्यदलाची आवड असलेले भारतभूषण हे अत्यंत शिस्तप्रिय व अभ्यासू व्यक्तिमत्व. सैन्याच्या शिस्तप्रिय वातावरण बरोबर विविध खेळांमध्ये ही त्यांनी मिळवलेले प्राविण्य आणि सेवेमध्ये असलेली तत्परता, कर्तव्यनिष्ठता आणि सचोटी यामुळे त्यांची लेफ्टनंट कर्नल पदी निवड झाली आहे.(Bhushan More of Sangamner elected as Lieutenant Colonel)

पठार भागातील वरुडी पठार गावचे रहिवासी असलेले व भारतीय सैन्यातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेले रामचंद्र मोरे यांचे चिरंजीव कॅप्टन भारतभूषण मोरे हे भारतीय सैन्यात कॅप्टन पदावर कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी चेन्नई, पठाणकोट, भोपाळ ,पुणे येथे आपली सेवा दिली आहे. जम्मू काश्मीर मधील कारगिल विभागात ते सध्या कार्यरत असून त्यांच्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी सैन्य दलात लेफ्टनंट कर्नल पदी बढती मिळवली आहे. नुकतेच त्यांना कारगिल येथे या पद्धतीचे पदक देऊन गौरविण्यात आले आहे. ते जोर्वे गावचे दिघे परिवाराचे जावई आहेत.

त्यांच्या या निवडीबद्दल राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे  आदींनी अभिनंदन केले असून पठार भागातील विविध गावे व जोर्वे परिसरातून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.(Bhushan More of Sangamner elected as Lieutenant Colonel)


हे सुद्धा वाचा :

रिक्षा व टॅक्सी वाहतुकीचे भाडेवाढ करून सर्वसामान्य प्रवाशांचे खिसे होणार रिकामे

मुंबईची बेस्ट होणार आता १००% इलेक्ट्रिक: आदित्य ठाकरेंची घोषणा

भाजपचा पोलखोल शिवसेनेचा डब्बा गोल : आशिष शेलार यांची ठाकरे सरकारवर टीका

जितेंद्र आव्हाडांनी नाशिक म्हाडाचा घोटाळा बाहेर काढला, अन् जनतेसाठी ५००० घरे उपलब्ध झाली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी