राजकीयमहाराष्ट्र

जितेंद्र आव्हाडांनी नाशिक म्हाडाचा घोटाळा बाहेर काढला, अन् जनतेसाठी ५००० घरे उपलब्ध झाली

नाशिकमध्ये 2013 ते 2022 पर्यंत 157 घरे म्हाडाला मिळाली होती. ह्यामध्ये काहीतरी घोटाळा आहे असे माझ्या ध्यानी येताच चौकशी सुरु केली. आजमितीपर्यंत 2031 घरे म्हाडाला प्राप्त झाली आहेत. आणि त्याची सोडत व लॉटरी मे आणि जून महिन्यात करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये जवळ जवळ 5000 घरे मिळतील असा अंदाज आहे. आणि माझे गाव असल्याकारणाने मी स्वतः तिथे येऊन लॉटरी काढणार आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे.

टीम लय भारी

नाशिक : शहरातील म्हाडा सदनिका घोटाळ्यात १५७ वरुन आत थेट २०३२ घरे म्हाडाला मिळाली आहेत. हा आकडा जवळपास ५ हजारांवर जाण्याड शक्यता असल्याचे गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. लवकरच या घरांची सोडत काढण्यात येणार आहे. नाशिकमधील म्हाडा घोटाळ्याप्रकरणी जास्तीची घरे मिळाल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन दिली. (Jitendra Awhad  statemen on Nashik MHADA flat scam)

जितेंद्र आव्हाडांनी नाशिक म्हाडाचा घोटाळा बाहेर काढला, अन् जनतेसाठी ५००० घरे उपलब्ध झाली

नाशिकमध्ये 2013 ते 2022 पर्यंत 157 घरे म्हाडाला मिळाली होती. ह्यामध्ये काहीतरी घोटाळा आहे असे माझ्या ध्यानी येताच चौकशी सुरु केली. आजमितीपर्यंत 2031 घरे म्हाडाला प्राप्त झाली आहेत. आणि त्याची सोडत व लॉटरी मे आणि जून महिन्यात करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये जवळ जवळ 5000 घरे मिळतील असा अंदाज आहे. आणि माझे गाव असल्याकारणाने मी स्वतः तिथे येऊन लॉटरी काढणार आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे.

नियमाप्रमाणे एक एकरापेक्षा जास्त मोठ्या बांधकाम प्रकल्पात आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी २० टक्के सदनिका राखीव ठेवणे बंधनकारक असते मात्र या नियमांचे पालन न झाल्यामुळे नाशिकमध्ये जवळपास 7 हजार सदनिका घोटाळ्यांची बाब समोर आली आहे.

नाशिक महापालिका हद्दीत बांधकाम व्यवसायिक आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने गोर गरिबांची घरं हडप केल्याची लक्षवेधी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण देरकर यांनी मांडली. दरेकर यांच्या आरोपात तथ्य असल्याचा दुजोरा खुद्द गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

हे सुद्धा वाचा :

राज्यात काही पक्ष धार्मिक व जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात : रोहित पवार

VIDEO : राजू शेट्टी ‘महाविकास आघाडी’तून नक्की का बाहेर पडले ते समजत नाही : जयंत पाटील

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close