30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयराज्यातील निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीकडून भाजपला मोठा धक्का

राज्यातील निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीकडून भाजपला मोठा धक्का

टीम लय भारी

मुंबई : देशात सध्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीवरून वातावरण तापलेलं आहे. चार राज्यात भाजपची तर एका राज्यात कॉंग्रेसची सत्ता आहे. नवी मुंबईत नवी राजकीय घडामोड घडली आहे(Big blow to BJP from NCP in the run up to state elections).

देशात विधानसभेचं वातावरण तापलेलं असतानाच राज्यात महापालिका निवडणुकीवरून जोरदार राजकारण पेटण्याची शक्यता आहे. भाजप आणि काॅंग्रेस दोन्ही पक्षांसमोर प्रत्येक राज्यात सत्ता टिकवणे हे मोठे आव्हान आहे. महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये सध्या जोरदार वाद चालू आहे. अशातच नवी मुंबईसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी राजकारण पेटलं आहे.

नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे मातब्बर नेते गणेश नाईक यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता.त्यांच्या जाण्यानं राष्ट्रवादीला फटका बसला होता. आता याचीच परतफेड राष्ट्रवादीकडून केली जात आहे. राजकारणात पक्षांतराची घटना प्रचंड गाजल्या आहेत. गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक रविंद्र इथापे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली आहे.

Big blow to BJP from NCP in the run up to state elections
गणेश नाईक

हे सुद्धा वाचा

टाउनशिप उभारण्याचा निर्णय योग्य होता, शरद पवार

गोंयकारांसाठी राष्ट्रवादीचा खास असा गोवा विकास प्लॅन!

पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांचं कौतुक झाले, पण राष्ट्रवादीचा मोदींवर पलटवार

NCP disapproves of protests outside homes of Opposition leaders in Maharashtra

राष्ट्रवादीचे मातब्बर नेते गणेश नाईक यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रावादीला सत्ता स्थापन करण्यासाठी गणेश नाईक यांच्या राजकीय वर्चस्वाला हादरा देणं गरजेचं होतं. नवी मुंबई महापालिेकेतील तब्बल 9 नगरसेवक लवकरच हातावर घड्याळ बांधणार आहेत. परिणामी आता राष्ट्रवादीनं मोर्चेबांधणी करायला सुरूवात केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी