30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeव्यापार-पैसाMobile Charger : मोबाईल चार्जर देखील करु शकतो तुमचे बँक खाते रिकामे

Mobile Charger : मोबाईल चार्जर देखील करु शकतो तुमचे बँक खाते रिकामे

मोबाईल चार्जर (Mobile Charger) देखील तुमच्या खिशाला कात्री लावू शकतो. हे सांगितले तर कोणालाही खरे वाटणार नाही. परंतु हे सत्य आहे. आज तंत्रज्ञानाच्या जगात काहीही घडू शकते. तंत्रज्ञान जितके प्रगत झाले आहे. तितकेच त्याचे धोके देखील मोठयाप्रमाणात वाढत चालले आहेत.

मोबाईल चार्जर (Mobile Charger) देखील तुमच्या खिशाला कात्री लावू शकतो. हे सांगितले तर कोणालाही खरे वाटणार नाही. परंतु हे सत्य आहे. आज तंत्रज्ञानाच्या जगात काहीही घडू शकते. तंत्रज्ञान जितके प्रगत झाले आहे. तितकेच त्याचे धोके देखील मोठयाप्रमाणात वाढत चालले आहेत. माणूस तंत्रज्ञानाच्या चक्रव्युहात गुरफटला जात आहे. त्याचे परिणाम त्याला दैनंदिन जिवनात भोगावे लागत आहेत. सोशल मीडियावर एका ठिकाणी एक माहिती उपलब्ध झाली आहे. मिळालेल्या माहिती नुसार एका व्यक्तीच्या खात्यातून काही लाखांची रक्कम अचानक गायब झाली होती. रक्कम मोठी असल्याने तो माणूस प्रचंड घाबरला. तो मोठा उदयोजक असल्या कारणाने त्यांच्या खात्यामध्ये रक्कम देखील मोठी होती.

त्या माणसाच्या खात्यातून लांखोंची रक्कम अचानक गायब झाली. त्यावेळेस त्याच्याकडे कोणीही OTP माग‍ितला नव्हता. कोणाचा कॉल देखील आला नव्हता. कोणत्याही प्रकारची ऑनलाईन लिंक देखील पाठवली गेली नव्हती. कोणतीही लिंक ओपन केली गेली नव्हती. तो माणूस स्वत: टेक्नोफ्रेंडली असल्याकारणाने मोबाईल वापरतांना त्याचा गोंधळ देखील उडण्याची शक्यता नव्हती. या घटनेमुळे तो चक्रावून गेला. सायबर क्राईम विभाग देखील शोध घेत होता. पण त्याचा उलगडा होत नव्हता. मोबाईलमध्ये देखील त्याचा क्लू लागला नाही. ठिकाण देखील ट्रेस होत नव्हते.

हे सुद्धा वाचा

ED : पत्राचाळ बैठकीला ‘दोन’ माजी मंत्री हजर असल्याचा ईडीचा आरोप

Ajit Pawar : अजित पवार आरोप करणाऱ्यांवर चांगलेच संतापले, म्हणाले होऊ द्या…..

Actress Samantha Ruth Prabhu : अभ‍िनेत्री सामंथा रुथ प्रभु घेतेय परदेशात उपचार

मात्र त्यांच्या ऑफ‍िसमध्ये लावलेला CCTV त्याच्या मदतीसाठी धावून आला. त्या कंपनीच्या मालकाचा मोबाईल चार्जर बदलण्यात आला होता. तो देखील ऑफ‍िसमध्येच, त्या ठिकाणी दुसरा चार्जर ठेवण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होते. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा स्वत:चा चार्जर ठेवण्यात आला होता. त्या मालकाची नजर चुकवून कोणीतरी हे काम केले होते. त्यामुळे कोणालाही संशय येण्याचे कारण नव्हते. तो चार्जर USB चार्जर होता.

त्या चार्जरचा आधार घेऊन त्याचा डेटा कॉपी करण्यात आला होता. त्याची संपूर्ण मोबाईल बँक हँक करण्यात आली. अकाउंटमधून पैसे काढण्यात आले. अशा प्रकाच्या चोरीमध्ये चार्जर सिप्लेस केला जातो. त्या पूर्वी त्या चार्जरमध्ये एक मायक्रो चिप बसवलेली असते. त्यात सगळा डाटा कॉपी केला जातो. त्यानंतर हॅकिंग hacking केले जाते. हा प्रकार चटक लक्षात येत नाही. कोणाला थोडा देखील संशय येत नाही. त्यामुळे सायबर चोर सहज आपल्या बँकेवर डल्ला मारु शकतात. त्यामुळे आता चार्जस आणि USB कॉड वापरतांना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

आपल्या मोबाईलसाठी दुसऱ्याचा चार्जर वापरु नका. तसेच अनोळखी ठ‍िकाणी आपल्या मोबईल चार्जींगला लावू नका. शक्यतो आपल्या स्वत:च्या घरीच मोबाईल चार्ज करायला विसरु नका. आपला चार्जर कधीच घरी क‍िंवा इतर ठिकाणी विसरु नका. कारण आपल्या विसरण्याचे आपले आयुष्य उद्धवस्त करु शकते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी