33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeव्यापार-पैसामोदींनी अतिश्रीमंत लोकांना सूट दिली, 5 ट्रिलियन इकॉनॉमीची घोषणा हवेत विरली!

मोदींनी अतिश्रीमंत लोकांना सूट दिली, 5 ट्रिलियन इकॉनॉमीची घोषणा हवेत विरली!

अदानी प्रकरणावर (Hindenburg Adani Controversy) संसदेत चर्चा करावी अशी आमची मागणी आहे, मात्र संसदेत चर्चा होणार नाही कारण पॅगॅसेस, राफेलवर चर्चा होऊ दिली नाही. त्यामुळे अत्यंत अपारदर्शक पद्धतीने सरकार चाललेले आहे. अर्थसंकल्पात (Union Budget 2023) सामान्य माणसाला दिलासा मिळालेला नाही. उलट गरीब माणसाला गरजेच्या अनुदानावर कपात केलेली आहे. आरोग्य शिक्षण सामाजिक सुरक्षा या कुठल्याही विषयावर ठोस तरतुद नाही त्यामुळे एका बाजूला 5 ट्रिलियन इकॉनॉमिकडे  (5 trillion economy) आम्ही जाणार अशी घोषणा करतात पण तिथपर्यंत कधी पोहचणार याबाबत काही भाष्य नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार ही घोषणा हवेत विरून गेली तशी 5 ट्रिलियन इकोनॉमीची घोषणा देखील हवेत विरून गेलेली आहे, अशी टिका कांग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. (PM Modi relief the super rich people, the announcement of 5 trillion economy was lost Criticism of Prithviraj Chavan)

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बुधवारी (दि.१) रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर पृथ्वीराज चव्हाण गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन कडाडून टीका केली.

पृथ्वीराज चव्हण म्हणाले, या अर्थसंकल्पात गरीब, सामान्य आणि शेतकऱ्यांवर भार टाकलेला आहे. सरकारने खतांच्या किंमतीवरील अनुदान कमी केल्याने त्याचा शेतकऱ्यांवर थेट परिनाम होणार आहे. तसेच कोरोना महामारीच्या काळात ज्या मनरेगा योजनेने गरगरीबांना जगविले अशा या मनरेगा योजनेवरील अनुदान कमी केले आहे. त्यामुळे ही गोरगरीबांचा हक्काचा रोजगार गेला आहे. या अर्थसंकल्पामध्ये आतिश्रीमंत लोकांवरील कराचा बोजा कमी केल्याने मोदींनी (PM Modi) अतीश्रीमंत लोकांना सूट दिल्याची टीका देखील यावेळी चव्हाण यांनी केली.

हे सुद्धा वाचा

IAS चंद्रकात दळवी म्हणतात; अर्थसंकल्पात कृषीला न्याय, ग्रामविकासाकडे दुर्लक्ष

बजेटमधली तुमच्या आमच्या कामाची बातमी : आता महिन्याला वाचू शकतील दहा हजार रुपये; कसे ते समजून घ्या …

BMC Budget 2023 : मुंबई महापालिकेच्या इतिहासात 38 वर्षांत प्रथमच प्रशासक मांडणार अंदाजपत्रक

देश महागाईमध्ये होरपळत आहे, डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी झाली आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये लोकांची क्रयशक्ती कमी झालेली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात करपतातीचे गाजर मध्यमवर्गाला दाखवले असल्याचे सांगतानाच स्टॉक मार्केटवरील नकारात्मक प्रतिसाद, अदानी प्रकरणावर सरकारची चुप्पी आदी विषयांवर देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारचा समाचार घेतला. तसेच नोकऱ्या, मॅन्यूफॅक्चरिंग सेक्टर आदी वाईट अवस्थेत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी