31 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रअल्पवयीन मुलीवर अत्याचार पीडित मुलगी गरोदर, प्रसूतीनंतर नवजात बालक सुरक्षित

अल्पवयीन मुलीवर अत्याचार पीडित मुलगी गरोदर, प्रसूतीनंतर नवजात बालक सुरक्षित

टीम लय भारी

कुडाळ : महाबळेश्वर तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाले असल्याची खळबळजनक घटना घटना घडली आहे. पीडित मुलगी गरोदर होती. प्रसूतीनंतर नवजात बालक सुरक्षित तर दोन संशयित आरोपी ताब्यात घेतले आहेत तसेच आणखीन आरोपी सापडण्याची शक्यता आहे (Abuse of a minor girl became pregnant, newborn child safe after delivery).

याप्रकरणी महाबळेश्वर येथील सागर उर्फ बाबा हनुमंत गायकवाड वय 30 ,आशुतोष मोहन बिरामणे 22 ,दोन्ही आरोपी राहणार मुनावरळ हाउसिंग सोसायटी महाबळेश्वर यांच्यावर महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीला धमकावत वारंवार तिच्याशी इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले. पीडित मुलीला गरोदर करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

संजय राऊत माझे मित्र : चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्र्यांच्या पत्राची मंत्रालयासमोर होळी

त्यानंतर पीडित मुलीची प्रसूती झाली. या सर्व घटनेने महाबळेश्वर तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. तीन दिवसांपूर्वीच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ शितल खराडे जानवे यांना अज्ञात खबऱ्याकडून सदर अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तात्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर शीतल खराडे जानवे यांनी घटनास्थळावर थेट-भेट दिली. पीडितेला विश्वासात घेत न्याय मिळवून देण्याचा विश्वास दिला.

नंतर पीडित मुलीने व तिच्या कुटुंबियांनी या संदर्भात सर्व हकीकत महाबळेश्वर पोलिस स्थानकामध्ये उपविभागीय अधिकारी डॉक्टर शितल जानवे यांना सांगितली. दरम्यान पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर संबंधित संशयित आरोपी यांच्याकडून पीडित कुटुंबीयांना तक्रार दिली तर यासंदर्भात धमकी देण्याचे प्रकार घडले होते.

त्यामुळे पीडित कुटुंब तक्रार देण्यास पुढे येत नव्हते, मात्र उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर शितल यांच्याकडे अज्ञात खबऱ्याने ज्यावेळी पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराची हकीकत सांगितली त्यावेळी तात्काळ डॉक्टर शितल जानवे यांनी यासंदर्भात तपासाला सुरू केला व पीडित कुटुंबीयांना विश्वासात घेतले व त्यांना न्याय मिळवून दिला या संदर्भात महाबळेश्वर शहरातील संशयित दोन आरोपींना महाबळेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आदित्य ठाकरेंची शहर सुशोभिकरणाकडे वाटचाल, सौंदर्याचा घातला घाट

Abuse
महाबळेश्वर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Hungary to Play One Match Behind Closed Doors, Fined Over Racist Abuse

सागर उर्फ बाबा हनुमंत गायकवाड व आशुतोष मोहन बिरामणे या दोन्ही संशयित आरोपी यांच्याबरोबर आणखीन काही आरोपी सापडण्याची शक्यता आहे दरम्यान ताब्यात घेतलेले आरोपी व यामध्ये आणखीन काही लोकही सामील आहे ही राजकीय धेडे असल्याचेही बोलले जात आहे.

त्यामुळे या पाठीमागे संशयित आरोपी यांसह इतर तपासात निष्पन्न होणारी राजकीय संशयित आरोपी आणखीन कोण कोण आहेत याकडे आता महाबळेश्वर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी