30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeटॉप न्यूजCovid Voice Test : आता आवाजावर होणार 'कोरोना'ची चाचणी

Covid Voice Test : आता आवाजावर होणार ‘कोरोना’ची चाचणी

टीम लय भारी

मुंबई : मुंबई महापालिकेने विविध उपायांद्वारे ‘कोरोना’ला अटोक्यात ठेवले आहे. आता महापालिकेने आणखी एक प्रयोग हाती घेतला आहे. ध्वनी लहरींवरुन (आवाजावरुन) कोरोनाचे निदान केले जाणार (Covid voice test trial Mumbai) आहे. या नव्या प्रयोगात ध्वनी लहरींवरुन कोरोना पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्ह असल्याचे निदान केले जाऊ शकते, अशी माहिती मुबई महापालिकेने दिली आहे. (Covid voice test trial Mumbai).

30 मिनिटात कोरोना विषाणूचे निदान होणार…

नेस्कोच्या जंबो केअर सेंटरमधील संशयित आणि कोविड -19 रूग्णांच्या आवाजाची तपासणी पुढच्या आठवड्यापासून केली जाईल, असंही महापालिकेने सांगितले. ध्वनी लहरींच्या या चाचणीमुळे केवळ 30 मिनिटात कोरोना विषाणूची लागण झाली आहे की नाही याचे निदान स्पष्ट होणार आहे. या चाचणीत जे पॉझिटिव्ह आढळतील त्यांचे आरटीपीसआर चाचणीने निदान पक्के केलं जाणार आहे, असंही महापालिकेने सांगितले.

ही संकल्पना अमेरिका आणि इस्त्रायल सारख्या देशांमध्ये वापरली जात आहे. ज्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं दिसतात तेव्हा त्यांना श्वासाचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. या सर्व प्रक्रियेत फुफ्फुसांच्या स्नायूंवर ही परिणाम होऊन त्यांना सूज येते. त्यामुळे आवाजावर परिणाम होतो. आवाजावर परिणाम झाल्यामुळे त्यात बदल होतो आणि याच बदललेल्या आवाजाला मोजण्यात येते आणि त्यातून त्या व्यक्तिला कोरोना झाला आहे का नाही हे स्पष्ट होते, असं पालिकेने सांगितले.

कपूर रुग्णालयाच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करुन 1000 व्यक्तींवर अभ्यास केला जाईल. या सर्व प्रक्रियेला किमान दोन ते तीन महिने लागतील, असं मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी