28 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरक्रीडासिकंदर शेखने पटकावली 'महाराष्ट्र केसरी' ची गदा

सिकंदर शेखने पटकावली ‘महाराष्ट्र केसरी’ ची गदा

महाराष्ट्र केसरी 2023-24 (Maharashtra Kesari) च्या अंतिम सामन्याचा निकाल लागला असून वाशिमच्या सिकंदर शेख (Sikandar Shaikh) याला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळाला आहे. सिकंदर शेख याने गतविजेत्या शिवराज राक्षेला (Shivraj Rakshe) चीत करत बाजी मारली आहे. 2022-23 च्या महाराष्ट्र केसरी विजेत्या शिवराज राक्षेला अवघ्या दहा सेकंदामध्ये आस्मान दाखवत सिकंदर शेख याने 66 वा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला आहे. पुण्यातील फुलगाव येथे यंदाची 66 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न होत सिकंदर शेखच्या विजयानंतर कुस्ती चाहत्यांनी एकच जल्लोष केल्याचे दिसून आले.


सेमी फायनलनमध्ये शिवराज राक्षे याने हर्षद कोकाटे याचा पराभव करत फायनल गाठली होती. तर माती विभागात सिकंदर शेखने संदीप मोटेचा सेमी फायनलमध्ये 10-0 पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उचलणार की सिकंदर यंदाचं महाराष्ट्र केसरीचं मैदान मारणार याकडे कुस्ती शौकिनांचं लक्ष लागलेले होते. पण, अखेर सिकंदरने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत बलाढ्य शरीरयष्टीच्या शिवराजला अवघ्या दहा सेकंदात चित करत आस्मान दाखवले.

हे ही वाचा 

मॅक्सवेलची तलवार तळपली; ‘या’ दिग्गजांचा रेकॉर्ड काढला मोडीत

‘पाकिस्तानच्या खेळाडूंचा वसिम आक्रमवर विश्वास नाही’

एंजेलो मॅथ्यूज झाला ‘टाइम आउट’, आता मॅचनंतरही होणार कारवाई

सिकंदर शेख याचा मागच्या केसरी स्पर्धेमध्ये पराभव झाला होता. यंदा त्याच्याकडे आलेल्या नामी संधी चे सोने करत त्याने मागच्या पराभवाचा वचपा काढला. शिवराज राक्षे याने मागील वर्षी महेंद्र गायकवाड याचा पराभव करत पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीवर नाव कोरलं होतं. यंदाही त्याने फायनल पर्यंत धडक मारली पण सिकंदरच्या अफलातून खेळापुढे त्याचा टिकाव लागला नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी