28 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरक्रिकेटश्रीलंका संघाची 'ना घर का ना घाट का' स्थिती

श्रीलंका संघाची ‘ना घर का ना घाट का’ स्थिती

देशात आयसीसी क्रिकेट विश्वचषक (ICC Wordcup) आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. या विश्वचषकात अनेक ट्विस्ट घडले आहेत. विराट शतक करणार का? ग्लेन मॅक्सवेल केलेले द्विशतक, भारत- पाकिस्तान संघातील सामना, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील टाईम आऊट प्रकरण या सर्वच घटनांमुळे सुरू असलेल्या वर्ल्डकपला एक वेगळेच वळण मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंका आणि बांगलादेशच्या सामन्यात टाईम आऊट प्रकरणामुळे श्रीलंकेची वेगळीच चर्चा सुरू होती. मात्र या संघाबद्दल आणखी बाब समोर आली आहे. श्रीलंका संघाचे क्रिकेट बोर्ड (Sri lanka Cricket board) आयसीसीने (ICC) निलंबित केले आहे. यामुळे आता श्रीलंकेची ना घर का ना घाट का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

काय आहे प्रकरण?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने श्रीलंका बोर्डाचे सदस्यत्व निलंबित केले आहे. श्रीलंका सरकारचा क्रिकेट बोर्डामध्ये हस्तक्षेप वाढला होता. आज झालेल्या आयसीसीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता हा निर्णय श्रीलंकेच्या जिव्हारी लागला आहे.

हे ही वाचा

अनुसूचित जातीचे तुकडे पाडण्यासाठी नरेंद्र मोदींची जंगी सभा !

टीम इंडियाचा पराभव करण्यासाठी गिलख्रिस्टने सांगितला कानमंत्र

मुंबईकरांनो आता दोनच तास वाजवा फटाके नाहीतर…

आज झालेल्या आयसीसीच्या बैठकीत श्रीलंकेवर गंभीर आरोप लावण्यात आले. आयसीसीचा सदस्य म्हणून आपली कोणतीच कामगिरी चोख बजावली नसल्याचा आयसीसीचा आरोप आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे स्वायत्तपणे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. मात्र प्रशासन यासाठी हस्तक्षेप करत नाही ना? असा सवाल उपस्थित झाला. यावर योग्य ती खात्री करण्याचे आयसीसीचे म्हणणे आहे. श्रीलंकेच्या निलंबनाच्या कारवाईवर आयसीसी योग्य तो निर्णय घेईल. असे आपले मत आयसीसीने मांडले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी