32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeक्रिकेटविराटची शतकी खेळी; अखेर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडीत

विराटची शतकी खेळी; अखेर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडीत

देशात यंदाच्या वर्ल्डकपमध्ये एकच चर्चा होती. गेली अनेक वर्षांपासून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ४९ शतक ठोकत विश्वविक्रम केला होता. याआधी अनेकदा सचिन तेंडुलकरला (sachin Tendulkar) आपला विश्वविक्रम कोण मोडीत काढेल असे अनेक प्रश्न विचारले जात होते. त्या प्रश्नाचे उत्तर सचिनने विराट आणि रोहित शर्मा तोडू शकतो. असे वक्तव्य केले होते. अनेक दिवसांपासून विराट कोहलीने सचिनच्या रेकॉर्डसोबत बरोबरी केली. आणि आज तर वानखेडेच्या स्टेडियमवर विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. टीम इंडिया आणि विराट कोहलीसाठी (virat kohli) आजचा न्यूझीलंडविरूद्धचा (India Vs NewZealand) सेमी फायनलचा सामना आयुष्यातील सुवर्णक्षण असणार आहे.

ज्या व्यक्तीला विराट कोहली टिव्हीवर पाहत होता. आज त्याच्याच रेकॉर्डशी बरोबरी केली जात आहे. तर आजच्या टीम इंडिया आणि न्यूझीलंडविरूद्ध विराट कोहलीने आपल्या शतकी खेळीने आसमान दाखवले आहे. काही दिवसांआधी विराटने सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डशी बरोबरी केली तेव्हा सचिन तेंडुलकरने ट्वीट करत लवकरच ५० वे शतक कर असे सांगितले. आजच्या सामन्यात विराटने आग ओकत फलंदाजी करत आपले ५० शतक पूर्ण करत सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.

हे ही वाचा

रोहित शर्माच्या एका षटकाराने विश्वविक्रम

‘हरभजन सिंहला धर्मपरिवर्तन करायचे होते’; पाकिस्तानी माजी क्रिकेटरचे वक्तव्य

ऐश्वर्या रायबद्दल पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे अपशब्द

सचिन आणि विराटचे खास कनेक्शन

सचिनने वानखेडेवर अधिक शतकं केली आहेत. तर विराटचे रोकॉर्ड ब्रेकिंग शतक हे वानखेडेवर झाले. सचिन ३४ वर्षांपूर्वी आपल्या वानखेडेच्या होम ग्राऊंडवर १५ नोव्हेंबर १९८९ साली आंतरराष्ट्रीय कसोटीत पदार्पण केले आहे. त्यावेळी पकिस्तानसह पहिला सामना खेळला गेला होता. याच दिवशी विराटने सचिनचा रेकॉर्ड मोडला आहे. सचिनने २०२३ साली ६६३ धावा केल्या. हा रेकॉर्डदेखील विराटने मोडला आहे. २०२३ मध्ये विराटने बांगलादेशविरोधात १०३ धावा करत ४९ वे शतक केले. आणि न्यूझीलंडविरूद्ध ५० वे शतक ठोकून जागतिक विक्रम केला आहे.

सर्वाधिक शतक करणारे फलंदाज

सर्वाधिक शतक करणारे भारतीय फलंदाजांमध्ये आता विराट कोहलीने विश्वविक्रम करत पहिला क्रमांकावर आपले नाव कोरल. दुसरा क्रमांक हा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा आहे. आणि तिसरा क्रमांक हा रोहित शर्माचा आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी