28 C
Mumbai
Saturday, December 9, 2023
घरसिनेमानाना पाटेकरांनी चाहत्याच्या कानाखाली काढला जाळ?

नाना पाटेकरांनी चाहत्याच्या कानाखाली काढला जाळ?

चित्रपटसृष्टीत काय घडेल आणि काय बिघडेल हे सांगता येत नाही. मराठी असो वा हिंदी सिनेमा दोन्ही ठिकाणी एकच परिस्थिती जाणवू लागली आहे. दरम्यान, अभिनेते नाना पाटेकर देखील मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतात. ते नेहमी कोणत्या ना कोणत्या वक्तव्यासाठी नाहीतर त्यांच्या आगामी सिनेमांसाठी चर्चेत असतात. मात्र आता ते एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. आज दिवसभर सोशल मीडियावर नाना पाटेकरांचा (Nana Patekar) एका व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. त्या व्हिडिओत नानाने एका चिमुरड्याच्या कानाखाली जाळ काढला आहे. यामुळे काही चाहत्यांनी नाना पाटेकरांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हा एका चित्रपटाच्या शूटिंगमधील सीन असल्याचा दिग्दर्शकाने खुलासा केला. (Bollywood Film)

नाना पाटेकर हे आपल्या अभिनयाने अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण करतात. महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राट या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका अजूनही जशीच्या तशी डोळ्यासमोर आठवते. अशातच आता नाना हे बनारसमध्ये चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. हा व्हिडिओ देखील त्याच चित्रपटातला असल्याची माहिती समोर येत आहे. सेल्फी घेण्यासाठी येणाऱ्या एका चाहत्याच्या त्यांनी कानाखाली वाजवली. आगामी सिनेमाचे शूटिंग करत असताना सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्यावर नानांनी संतापून हात उचलला.

हेही वाचा

विराटची शतकी खेळी; अखेर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडीत

रोहित शर्माच्या एका षटकाराने विश्वविक्रम

‘हरभजन सिंहला धर्मपरिवर्तन करायचे होते’; पाकिस्तानी माजी क्रिकेटरचे वक्तव्य

नानांनी चाहत्याला कानाखाली मारल्यानंतर त्या चाहत्याला सेटवरून हकलवण्यात आले आहे. हा व्हिडिओ अधिकाधिक व्हायरल होऊ लागला आहे. चाहत्याला सेल्फी न देता डोक्यात मारल्याने नेटकऱ्यांनी टीकेचे बॉम्ब फोडले आहेत. मात्र आता यावर दिग्दर्शक अनिल शर्माने दावा केला आहे की, हा एका चित्रपटातील सीन आहे. तर बनारसमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याची माहिती दिग्दर्शकाने दिली.

दरम्यान, नाना सध्या बनारसमध्ये शूटिंग करत आहेत. ते आगामी जर्नी (Journey) या चित्रपटातून दिसणार आहेत. तर काही दिवसांपूर्वी ‘द वैक्सीन वॉर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. मात्र हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याचप्रमाणे गदर २ या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मांनी केले असून जर्नीचे दिग्दर्शन तेच करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी