27 C
Mumbai
Thursday, June 27, 2024
Homeक्रिकेटभारत-पकिस्तान सामन्यावर कोणते विघ्न?

भारत-पकिस्तान सामन्यावर कोणते विघ्न?

वर्ल्ड कप 2023 मधील बहुचर्चित भारत – पकिस्तान सामन्याला आता थोडाच अवधि बाकी राहिला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे दुपारी दोन वाजेपासून ह्या सामन्याला सुरुवात होणार असून अहमदाबादमधील वातावरणाबद्दल आता मोठी अपडेट आली आहे. भारतीय हवामान विभागाने शनिवारी, अहमदाबाद मध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे, सामन्यादरम्यान पाऊस पडला तर हा महत्वाचा सामना रद्द होणार की काय? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. याआधी, श्रीलंकेत झालेल्या आशिया कप मधील भारत – पाकिस्तानचा गटातील सामना पावसामुळे रद्द केला होता, आता, पुन्हा एकदा तशीच परिस्थिति निर्माण होणार का असा प्रश्न आहे.

आजचा सामना भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही संघांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. भारताने वर्ल्ड कप मध्ये आतापर्यंत झालेल्या दोन लढतींमध्ये विजय मिळवला आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला नमवून टीम इंडियाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. अश्यातच, आज होणाऱ्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही विजय मिळवण्यास टीम इंडिया उत्सुक आहे. यापूर्वी, पाकिस्तान विरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप लढतीनमध्ये सात वेळा नमवून एक अनोखा विक्रम केला आहे. यावेळीही, पाकिस्तानला आठव्यांदा हरवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.


दुसरीकडे, पाकिस्तानची देखील या वर्ल्ड कप मधील कामगिरी उत्तम चालली आहे. त्यांनी आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. नेदरलँड आणि श्रीलंकेला हरवून पाकिस्तानची गाठ आता टीम इंडियाशी पडणार आहे. आतापर्यंत भारताविरुद्ध वन डे वर्ल्ड कप मध्ये एकही विजय मिळवू न शकल्यामुळे यावेळी भारतात भारताला हरवण्याच्या उद्देशाने पाकिस्तान मैदानात उतरेल.

हे ही वाचा 

आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश

भारत-पाकिस्तान सामन्यावर ड्रोन्सची भेदक नजर

भारत-पाकिस्तान सामन्यासाठी बॉलिवूडसह पाकिस्तानी पत्रकारांची उपस्थिती

सामन्यापूर्वीचा हवामान अंदाज

भारतीय हवामान विभागाने शनिवारी अहमदाबादमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला होता. परंतु आता नरेंद्र मोदी स्टेडियम परिसरात आकाश निरभ्र असल्याचे समजत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार सामन्यादरम्यान 47% आद्रता असेल. तर तापमान 30 ते 35 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा हवामान विभागाने संध्याकाळी पाऊस पडण्याची 1 टक्का शक्यता वर्तवली आहे.

सामन्यात पाऊस पडल्यावर काय होणार?

अहमदाबादमध्ये आज भारत – पाकिस्तान मॅचदरम्यान पावसाने व्यत्यय आणला आणि सामना रद्द करावा लागला तर दोन्ही संघांना 1-1 गुणांचे वाटप करण्यात येईल. वर्ल्ड कपमधील अंतिम आणि उपांत्य सामन्यासाठी पावसाने व्यत्यय आणल्यास राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. मात्र, गटातील सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी