29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeक्रिकेट'राम सिया राम...' गाण्यावर विराट कोहली भक्तीत तल्लीन, भाजपने व्हिडीओ शेअर करत...

‘राम सिया राम…’ गाण्यावर विराट कोहली भक्तीत तल्लीन, भाजपने व्हिडीओ शेअर करत उचलला फायदा

आयोध्या येथे श्रीरामाच्या मंदिराची सर्वत्र चर्चा आहे. राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची २२ जानेवारी दिवशी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला देशभरातून अनेकांना निमंत्रण आलं आहे. मात्र काही राजकीय नेत्यांना निमंत्रण न आल्याने राम मंदिराचा मुद्दा आता दिवसेंदिवस चर्चेत आला आहे. अशातच आता केपटाऊनमध्ये सुरू असलेल्या इंडिया विरूद्ध द.आफ्रिका (Ind vs South Africa) या कसोटी मालिकेमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat kohli) प्रभू श्रीरामाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाला आहे. केपटाऊनच्या मैदानावर ‘राम सिया राम’ (Ram Siya Ram) हे गाणं लावण्यात आलं होतं, या गाण्यावर टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहलीने आपले दोन्ही हात जोडून श्रीरामाला वंदन केलं आहे.

दक्षिण आफ्रिका विरूद्ध टीम इंडिया या दोन्ही संघांमध्ये बुधवारी ३ जानेवारीपासून दुसरा कसोटी सामना सुरू झाला. पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र अशातच दुसऱ्या सामन्यामध्ये द.आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेकी जिंकून फलंदाजीचा निर्णय स्विकारला. त्याचा निर्णय चुकीचा ठरला असून या सामन्यामध्ये मोहम्मद सिराजने या गोलंदाजाने केवळ १५ धावा देत ६ गडी बाद केले आहेत. यामुळे दुसरा कसोटी सामना सध्या चर्चेमध्ये आहे. दरम्यान या सामन्यामध्ये ‘राम सिया राम..’ या गाण्याची झलक पाहायला मिळाली आणि त्या गाण्यावर टीम इंडियाचा फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू विराट कोहलीने आपले दोन्ही हात जोडत रामलल्लाला वंदन केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार प्रसारित होत आहे. हा व्हिडीओ आता भाजपा महाराष्ट्र या ‘x’ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हे ही वाचा

‘शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा’

‘पोलिसवाले इतकं मारा की गाxxxची हड्डी तुटली पायजे, कुत्र्यासारखं मारा’

‘आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराच्या बाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत’

 

केशव महाराज मैदानावर येताच ‘राम सिया राम…’ गाण्याची झलक

आफ्रिकेच्या डावादरम्यान केशव महाराज मैदानावर आला. यावेळी त्याच्या खेळपट्टीवर येण्यानं आदीपुरूष चित्रपटातील ‘राम सिया राम …’ हे गाणं लावण्यात आलं. हे पाहून कोहलीचा आनंद गगणात मावेनासा झाला. त्याने आपले दोन्ही हात जोडले. त्याने श्रीरामाने उचललेल्या धनुष्याप्रमाणे हावभाव केले आहे. हे पाहून स्टेडिअममध्ये बसलेले चाहते आनंदी झाले. विराट कोहलीने प्रभू श्रीरामाला दोन्ही हात जोडून केलेलं वंदन आणि त्याप्रमाणे उचललेलं धनुष्यबाण, हे कॅमेऱ्यामध्ये कैद झालं असून सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी