28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाटीम इंडिया संघाचा ‘एवढ्या’ मर्यादित चेंडूंमध्ये सामना निकालात, कसोटी सामन्यात केपटाऊनमधील पहिला...

टीम इंडिया संघाचा ‘एवढ्या’ मर्यादित चेंडूंमध्ये सामना निकालात, कसोटी सामन्यात केपटाऊनमधील पहिला विजय

द. आफ्रिका आणि टीम इंडियामध्ये (India vs south Africa) दोन कसोटी सामने खेळवण्यात आले होते. दोन्ही सामन्यांमध्ये उत्तमरीत्या खेळ झाला. पहिल्या सेंच्युरियन येथील कसोटी सामन्यात टीम इंडियाला ३२ धावांनी लाजिरवाणी हार पत्करावी लागली होती. तसेच द. आफ्रिकेनं पहिल्या सामन्यात विजय मिळवत टीम इंडियावर वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. तर दुसऱ्या सामन्यामध्ये टीम इंडियाने अफलातून कामगिरी केली आहे. टीम इंडिया या संघाला दुसऱ्या सामन्यामध्ये केवळ ७९ धावांची आवश्यकता हवी होती. ती टीम इंडियाने सहजरीत्या पूर्ण केली आहे. अशातच आजपर्यंत असं कधी नव्हतं झालं ते आज झालेलं पाहायला मिळत आहे. कमी चेंडूमध्ये कसोटी सामना निकालात लावला आहे.

कमी चेंडूंमध्ये कसोटी सामना निकाली

क्रिकेटच्या कसोटीविश्वामध्ये या काही वर्षांमध्ये अस कधीच झालं नव्हतं ते आता झालेलं पाहायला मिळत आहे. द. आफ्रिका आणि टीम इंडियाचा दुसरा कसोटी सामना हा काहीच चेंडूंमध्ये निकाली लागला आहे. खरं तर हा टीम इंडियासाठी एक विश्वविक्रम आहे. कारण १९३२ साली मेलबर्न कसोटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेचा ६५६ चेंडूमध्ये सामना निकाली लावला होता. आता द. आफ्रिकासंघाविरोधात हा विक्रम मोडीत काढत टीम इंडियाने केवळ ६४२ चेंडूंमध्ये सामना निकाली लावला आहे.

हे ही वाचा

‘राम सिया राम…’ गाण्यावर विराट कोहली भक्तीत तल्लीन, भाजपने व्हिडीओ शेअर करत उचलला फायदा

‘शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा’

सिराजने द. आफ्रिकन खेळाडूंना केलं चारही मुंड्या चित

दरम्यान या सामन्यामध्ये सुरूवातीला द. आफ्रिकेचा ६२ धावांवरून १७६ धावांवर डाव आटोपला. त्यानंतर  टीम इंडियाला केवळ ७९ धावांची आवश्यकता होती. के.एल. राहुल आणि रोहित शर्मा या जोडीने विजयापर्यंत आपल्या सामन्याला नेऊन ठेवलं आहे. अशातच जसप्रीत बुमराहने ६१ धावांमध्ये सहा फलंदाजांना बाद केलं आणि डाव संपुष्टात आला.

टीम इंडियाने याआधी केपटाऊन या मैदानावर एकही विजय मिळवला नव्हता. तसेच पहिल्या सेंच्युरियनच्या विजयानंतर दुसऱ्या केपटाऊनच्या मैदानावरील सामन्यामध्ये टीम इंडियाने ६४२ चेंडूंचा सामना खेळत आपल्या संघाला विजयाच्या दाराशी पोहचवलं. तसेच आतापर्यंत केपटाऊन येथे ६ सामने खेळवण्यात आले होते. त्यापैकी ४ सामन्यामध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. त्यापैकी एकाही सामन्यात विजय मिळवला नाही. मात्र आजच्या केपटाऊनमधील विजयाने त्यांनी  विजयाचा श्रीगणेशा केला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी