22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
Homeमहाराष्ट्रकौतुकास्पद! नांदेडच्या ZP मध्ये ‘ई-फाईल ट्रेकिंग सिस्टिम’ सुरू; 582 फाईल्स निघाल्या निकालात

कौतुकास्पद! नांदेडच्या ZP मध्ये ‘ई-फाईल ट्रेकिंग सिस्टिम’ सुरू; 582 फाईल्स निघाल्या निकालात

नांदेड जिल्हा परिषदेतील कामांना गती मिळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी ‘ई-फाईल ट्रेकिंग सिस्टिम’ची सुरू केलेली आहे. विविध विभागातील प्रलंबित संचिका निकाली काढण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेल्या अभिमन्यू काळे यांनी हा उपक्रम प्रायोगित तत्वावर सुरू केलेला होता. आता विद्यमान सीईओ करणवाल यांनी या प्रणालीची अमलबजावणी सुरू केलेली आहे.  शिक्षण आणि आरोग्य विभाग ऑनलाईन केलेली आहे. पुढील टप्प्यात वित्त व सामान्य प्रशासन विभाग ई-फाईलनुसार अपडेट होणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांची विविध कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होत असतात. मात्र, वेळेवर कामे होत नसल्यामुळे नागरिकांनी कार्यालयाला वारंवार यावे लागते. त्याचाच विचार करून 9 जानेवारी 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी ‘ई-फाईल ट्रॅगिंक सिस्टिम’ची शिक्षण विभागातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागात सुरूवात केलेली आहे. यामुळे किनवट, माहूर, देगलूर, मुखेड अशा तालुक्यातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

…अशी काम करणार नवी सिस्टिम

या संदर्भात नांदेड जिल्हा परिषदेतील विविध विभागप्रमुखांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर प्रयोगिक तत्वावर शिक्षण आणि आरोग्य ‘ई-फाईल ट्रॅगिंक सिस्टिम’ची सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आवाकमंध्ये येणारी फाईल, तसेच पत्रांपासून संचिकेचा प्रवास सुरू होणार आहे. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याकडे पत्र किंवा फाईल गेली की, या प्रणालीनुसार क्यूआर कोड मिळणार आहे. संबंधित कर्मचारी लाॅग इन करेल आणि फाईलची नोंद करेल, त्यानुसार फाईलला क्रमांक मिळेल. त्यानंतर अधिक्षक, कक्ष अधिकारी यांच्याकडून वरिष्ठांपर्यंत फाईलचा प्रवास होईल. ही संपूर्ण सिस्टिम राबविण्यासाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याला लाॅग इन आयडी व पासवर्ड मिळणार आहे. त्यानुसार कामाला सुरूवात झालेली आहे.

‘ई-फाईल ट्रॅगिंक सिस्टिम’ उपक्रमाचा फायदा काय? 

‘ई-फाईल ट्रॅगिंक सिस्टिम’ उपक्रमामुळे दप्तर दिरंगाई टाळली जाईल, फाईल प्रलंबित राहणार नाही, त्याचबरोबर कोणत्या कर्मचाऱ्याकडे कितीवेळ फाईल राहिली याचाही आढावा घेत येणार आहे. हे सर्व काम ऑनलाईन होत असल्यामुळे फाईलचा प्रवास काल मर्यादेत राहील. नांदेड जिल्हा परिषदेत ही सिस्टिम सुरू झाल्यामुळे शिक्षण आणि आरोग्य विभागातील सुमारे 582 फाईल्सची पोर्टलवर निकाली निघाल्या आहेत. त्यामुळे ही नवी करप्रणाली सर्व विभागात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिली आहे.

हे ही वाचा : शिवसेना काय भाजपच्या दावणीला बांधलेली नाही, 12 जागांचा प्रस्ताव मान्य नाही, शिंदे गटाच्या खासदाराची तिखट प्रतिक्रिया

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी