26 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeक्रिकेटमुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर हार्दिक पांड्याचा शिक्कामोर्तब

मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर हार्दिक पांड्याचा शिक्कामोर्तब

आगामी 2024 आयपीएलला (IPL) काही महिने उरले आहेत. अशातच आता आयपीएलची चांगलीच पूर्वतयारी पाहायला मिळत आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदाची धुरा रोहित शर्माकडे (Rohit sharma) होती. मात्र आता ती धुरा मागील काही वर्षात गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) कर्णधार राहिलेल्या हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandaya) सोपवण्यात आली आहे. मुंबईने काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्याला ट्रेड करत १५ कोटींमध्ये पुन्हा मुंबईमध्ये स्थान दिलं आहे. त्यातील ७.५० कोटी हे गुजरात संघाला आणि ७.५० कोटी हार्दिक पांड्याला देण्यात आले आहेत, अशा चर्चा आहेत. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) आगामी कर्णधार असल्याची मुंबईने अधिकृत घोषणा केली आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली पांड्याने आपल्या गुजरात संघाला आयपीएलमध्ये चॅम्पियन म्हणून ओळख करून दिली आहे. आता पुन्हा एकदा हार्दिक पांड्याने मुंबईमध्ये कमबॅक केलं असून त्याला कर्णधारपद दिलं असून एक मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यांवर दिली आहे.

हे ही वाचा

श्रेयसची प्रकृती स्थिर; पत्नी दिप्तीच्या सोशल मीडियावरील पोस्टने वेधलं लक्ष

दिशा सालियन प्रकरणी शर्मिला ठाकरे उत्तरल्या

महेंद्र सिंह धोनीची ७ क्रमांकाची जर्सी होणार निवृत्त

रोहित शर्माच्या नेतृत्वात पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद

आतापर्यंत मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा होता. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीमध्ये चांगली कामगिरी केली होती. मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल पाच वेळा विजेतेपदाचे दावेदार म्हणून मुंबईने आपले नाव आयपीएपलच्या ट्रॉफीवर कोरलं आहे.

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर शिक्कामोर्तब

दरम्यान मुंबईने आयपीएलच्या एका अधिकृत वेसबसाईटवर निवेदन देत पांड्याला कर्णधारपद देणार असल्याच्या माहितीवर आता शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. हार्दिक पांड्याने स्वत: ही माहिती शेअर केली आहे. या निवेदनात मुंबई इंडियन्सने कर्णधार बदलाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने चांगले यश संपादन केलं आहे. यापुढे आता हार्दिक पांड्या आगामी आयपीएलमध्ये कर्णधार पदाची धुरा सांभाळणार असल्याचे निवेदनात स्पष्टोक्ती दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी